संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेचे व्यवस्थापन
दाभोळ ः दी यंग पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित नॅशनल हायस्कूल मांदिवलीत शिक्षकदिनी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे व्यवस्थापन सांभाळले होते. इसरार मुकादम याने कुराण पठण, वजिहा भारदे हिने हमद, शोऐब मुकादम याने नात सादर केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अरशद परकार यांनी केले. अरशद परकार, अब्दुल जमादार, फहीमा जुवळे यांनी शिक्षकदिनाचे महत्व विषद केले. या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना वस्तुरूपाने भेट दिली तसेच उर्दू भाषालेखन स्पर्धेत प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. अध्यक्षीय भाषणात शाळेत शिस्त ठेवून यशस्वी होण्याकरिता आवश्यक गुणाबद्दल फैयाज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
------------------
रांगोळी स्पर्धेत अनिल काकडे प्रथम
दाभोळ ः कृषी महाविद्यालय, दापोलीच्यावतीने दापोली येथे रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अनिल काकडे यांना प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या अनुक्रमे अशिनी डांगोरे आणि गार्गी सावंत. श्रृती गुजर, श्‍वेता यादव आणि सुयश वैद्या यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ १ आणि उत्तेजनार्थ २ आणि उत्तेजनार्थ ३ क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वरूपात रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण विद्याधर ताम्हणकर आणि सुजाता दाभोळे यांनी केले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी रांगोळी स्पर्धेसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, विविधतेतून एकता आणि स्वातंत्र्यलढ्यातील न ऐकलेले नायक अशा तीन प्रकारचे प्रतिपाद्य विषय देण्यात आले होते. चित्रकला प्रदर्शनात एकूण ५७ चित्रे प्रदर्शित करण्यात आली. महाविद्यालयातील सहाय्यक नियंत्रक अपर्णा जोईस यांनी दापोली परिसरातील त्यांच्या कॅमेर्‍याने टिपलेली ३५ पक्षांची छायाचित्रेही प्रदर्शित करण्यात आली होती.
----------------------

मुंबई-दाभिळ-पांगरी निमआराम बस १५ पासून

दाभोळ ः मुंबई-दाभीळ-पांगरी मार्गावर मुंबई सेंट्रल आगाराची निमआराम बस १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ही बस सायन, पनवेल, मागणगाव, महाड, दापोली, वाकवली, उर्फी, पन्हाळेकाझी लेणी, दाभिळमार्गे जाईल. मुंबई सेंट्रल येथून ही बस सकाळी ११.३० वा. सुटून दापोली येथे सायं. ६.३० वा. येईल तर पांगारी येथे रात्री ८ वा. पोहचेल. पांगारी येथून मुंबईला जाण्यासाठी बस पांगारी येथून सकाळी ८.३० वा. सुटेल. दापोली येथे सकाळी १० वा. येईल तर मुंबई सेंट्रल येथे ४ वा. पोचेल. या बससेवेचा लाभ परिसरातील प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------

फोटो- rat११p५.jpg ःKOP22L49388 गुहागर ःमनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सत्कारप्रसंगी हजर असलेले मनसे कार्यकर्ते

मनसे गुहागर संपर्क अध्यक्ष
प्रमोद गांधी यांचा सत्कार
गुहागर ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना कौंढर काळसुर शाखेच्यावतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी तालुक्यात गावभेट दौरा सुरू केला आहे. तालुक्यातील युवापिढी मनसेकडे आकर्षित होत आहे. कौंढर काळसूर येथे झालेल्या कार्यक्रमात गांधी म्हणाले, ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराना प्रेरित होऊन अनेक तरुण मनसे पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्याच्यादृष्टीने सर्व जागांवर उमेदवार उभा करून तो उमेदवार जिंकावा यासाठी आतापासूनच तयारी करावी. गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, कौंढर काळसुर शाखाध्यक्ष समीर जोयशी, विनेश तांबे, नीलेश तांबे, महेश जोयशी, अरविंद जोयशी आदी मान्यवर उपस्थित होते.
-----
मयेकर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
रत्नागिरी ः तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित पाच दिवसीय आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रशिक्षण झाले. यात ७० प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता. प्रशिक्षणात नागरी संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सहाय्यक उपनियंत्रक म्हात्रे, सुनील मदगे यांनी बौद्धिक व प्रात्यक्षिकांसह अतिशय सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. सांगता कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष सुनील मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. आपत्ती काळामध्ये लोकांचा जीव वाचावा, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये पुरामध्ये नागरिकांना कसे वाचवायचे, प्रथमोपचार कसा करावा, आग कशी विझवावी, दरडी कोसळल्याने होणारी आपत्ती, अपघातग्रस्त लोकांना प्रथमोपचार कसे करावेत, वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थिती कशा हाताळाव्यात, प्रसंगात मनोधैर्य कसे वाढवावे या विषयी शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी अनेक बाबींवर अतिशय सविस्तर आणि प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95043 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..