गुहागर ः गुहागरचा पुढील आमदार मनसेचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः गुहागरचा पुढील आमदार मनसेचा!
गुहागर ः गुहागरचा पुढील आमदार मनसेचा!

गुहागर ः गुहागरचा पुढील आमदार मनसेचा!

sakal_logo
By

फोटो- rat११p७.jpg -KOP२२L४९३९९ गुहागर ः तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटपन्हाळे येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण

गुहागरचा पुढील आमदार मनसेचा
जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण ; शेठ येऊदे नाहीतर भाई
गुहागर, ता. ११ ः शेठ येऊदे नाहीतर भाई येऊदेत. २०२४ मध्ये गुहागरचा आमदार मनसेचाच होणार असल्याचा विश्वास मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
मेळाव्यापूर्वी शृंगारतळी बाजारपेठेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शृंगारतळी बाजारपेठेतून रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले.
चव्हाण म्हणाले, ‘गुहागर तालुक्यात मनसे पक्ष वाढण्यास काहीच अडचण नाही. येथील तालुकाध्यक्ष व तालुका संपर्क अध्यक्ष जोमाने मनसे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील लोकप्रतिनिधी तालुक्यातील विविध प्रश्न, समस्यांवर विधिमंडळात बोलत नाहीत, रत्नागिरी जिल्ह्यातील विकासाचे वाटोळे करण्याचे काम फक्त शिवसेनेने केले. पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत राजकारण बाजूला ठेवून पक्षहितासाठी काम करा. रत्नागिरी आजही मागास राहिला आहे. नागरी सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आज जनतेच्या प्रश्नावर मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, जनतेला न्याय देण्याचे काम केले पाहिजे.’
काहीजण चुकीच्या गोष्टी पसरवून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु, पुढील काळात हा प्रकार चालू देणार नाही. मनसे सैनिकांनी प्रत्येक घराघरात जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मेळाव्यासाठी मनसे जिल्हा सचिव संतोष नलावडे, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर, बोरगावचे सरपंच सुनीलहळदणकर, गुरू पाटील, प्रशांत सावर्डेकर, उदय घाग, रमेश गांधी, अभिनव भुरण, डॉ. प्रदीप आठवले, समीर जोयशी, राहुल जाधव, तेजस पोफळे आदी उपस्थित होते. या वेळी गुहागर तालुका मनसेच्यावतीने जितेंद्र चव्हाण, संतोष नलावडे, प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट
मनसे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी
गांधी यांनी गणेशोत्सवामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावात मनसे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. त्याला कार्यकर्त्यांनीही प्रचंड प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातही मनसे सैनिक असल्याचे पाहून आनंद झाला. गावागावात जल्लोषाने होणारे स्वागत पाहून एक दिवस नक्की या गुहागरवर मनसेचा झेंडा फडकेल यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95049 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..