रत्नागिरी ः पशुधन असलेल्या गोठ्यांमध्ये औषध फवारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः पशुधन असलेल्या गोठ्यांमध्ये औषध फवारणी
रत्नागिरी ः पशुधन असलेल्या गोठ्यांमध्ये औषध फवारणी

रत्नागिरी ः पशुधन असलेल्या गोठ्यांमध्ये औषध फवारणी

sakal_logo
By

पावणेतीन लाख पशुधनावर ठेवणार नजर
लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव नाही ; गोठ्यांमध्ये फवारणी
रत्नागिरी, ता. ११ ः जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये झालेला नाही; मात्र सतर्कता म्हणून ग्रामपंचायतीच्या मदतीने जनावरे ठेवण्यात येणार्‍या गोठ्यांमध्ये औषध फवारणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात २ लाख ७६ हजार जनावरे असून, रोगाबाबत सद़ृश लक्षणे आढळून आल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे केले आहे.
शनिवारी (ता. १०) जिल्हा परिषद येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी डॉ. पनवेलकर, सहाय्यक आयुक्त पशुधन चिपळूण सुधीर कानसे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुचिता शिंदे उपस्थित होते. लम्पी स्कीन हा विषाणूजन्य त्वचारोग असून, त्याचा प्रादुर्भाव सर्व वयाच्या पशुंना होतो. प्रामुख्याने हा आजार गायी-म्हशींमध्ये आढळत आहे. माशा, डास, गोचडी याशिवाय बाधित जनावरांच्या त्वचेतील वाहणारा रक्तस्राव, लाळ यांच्या संपर्कामुळे तसेच दूषित वैरण, पाणी यामुळे होतो. शरीरावर १० ते १५ मि. मी. व्यासाचा कडक गाठी येणे, नाकातून-डोळ्यातून रक्तस्राव होतो, भूक कमी होते, दूध उत्पादन कमी येते, पुढील पायात सूज येते, लंगडणे अशी लक्षणे दिसतात. बाधित जनावरे दोन ते तीन आठवड्यात बरी होतात. या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी बाधित जनावरांपासून निरोगी जनावरे वेगळी ठेवावीत. गोठ्यातील गोचडींचा औषध फवारून बंदोबस्त करावा. परिसर कीटकनाशक औषधे फवारावीत. जनावरांचा बाजार भरवण्यात येऊ नये. आजारावरील लस नजीकच्या पशुसंधर्वन दवाखान्यात संपर्क साधून टोचून घेण्यात यावी. या रोगाबाबत सद़ृश लक्षणे आढळून आल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय तसेच पंचायत समितीमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यात लम्पी स्कीन रोग हा काही नवीन नाही. गतवर्षी जिल्ह्यात या रोगाने बाधित जनावरे आढळून आली होती. त्यांच्यावर वेळेत उपचार केल्याने मृत्यू झाला नव्हता. यावर्षीही जि. प. पशुसंवर्धन विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे ७३ व स्टेटचे ८० असे एकूण १५३ दवाखाने असून, या ठिकाणी या रोगासंदर्भात औषधे देण्यात आली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95050 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..