संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

फलोत्पादन विकासांतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण
रत्नागिरी ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण हा घटक पाण्याचा साठा निर्माण करणे व साठवलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगवण्यासाठी साठवलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने ५० टक्के अनुदानावर राबवण्यात येत आहे. वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी आकारमाननिहाय अनुदान आहे. १५ हजार १५३ मीटर शेततळ्यासाठी ५० टक्के प्रमाणे जास्तीत जास्त अनुदान २८ हजार २७५ रुपये, शेततळ्याचे आकारमान २० हजार १५३ मीटर असल्यास अनुदान ३१ हजार ५९८ रुपये, शेततळे २० हजार २०३ मीटर असल्यास ४१ हजार २१८ रुपये, शेततळे २५ हजार २०३ मीटर असल्यास अनुदान ४९ हजार ६७१ रुपये, २५ हजार २५३ मीटर शेततळ्यासाठी ५८ हजार ७०० रुपये अनुदान, ३० हजार २५३ मीटर शेततळ्याच्या आकारमानासाठी ६७ हजार ७२८ रुपये अनुदान, शेततळ्यांचे ३० हजार ३०३ मीटरसाठी ७५ हजार अनुदान आहे. शेतकर्‍यांनी याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत तसेच अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
........

एकात्मिक फलोत्पादन अंतर्गत सामूहिक शेततळे
रत्नागिरी ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे हा घटक फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे व दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकाच्या क्षेत्रविस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे या उद्देशाने १०० टक्के अनुदानावर राबवण्यात येत आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. पात्र शेतकर्‍यांना पुढीलप्रमाणे अनुदान आहे. सामूहिक शेततळे घटकासाठी आकारमाननिहाय देय अनुदान पुढीलप्रमाणे आहे. २ हेक्टर ते ५ हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादन क्षेत्रात ३४ हजार ३४४ मीटर शेततळ्यासाठी हेक्टरी ३ लाख ३९ हजार रुपये अनुदान, १ हेक्टर ते २ हेक्टर फलोत्पादन क्षेत्राला १ लाख ७५ हजार रुपये अनुदान आहे. शेतकर्‍यांनी याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95083 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..