सांगेली-जायपीवाडी रस्ता खड्ड्यांमुळे धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगेली-जायपीवाडी रस्ता 
खड्ड्यांमुळे धोकादायक
सांगेली-जायपीवाडी रस्ता खड्ड्यांमुळे धोकादायक

सांगेली-जायपीवाडी रस्ता खड्ड्यांमुळे धोकादायक

sakal_logo
By

49450
सांगेली ः जायपीवाडी येथे रस्त्यावर मध्यभागी पडलेला खड्डा.

सांगेली-जायपीवाडी रस्ता
खड्ड्यांमुळे धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः आंबोली-बेळगाव मार्गावर माडखोल ते धवडकीपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. सांगेली-जायपीवाडी वडाजवळ रस्त्यावर मध्यभागी मोठा खड्डा पडला असून त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या मध्यभागीच मोठी भेग पडल्याने अपघाताची भीती आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे धोकादायक बनला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी, अशी मागणी कलंबिस्त येथील शाहू पास्ते यांनी केली आहे. धवडकी ते सांगेली भागात रस्त्याच्या बाजूनेच तेरेखोल नदी वाहते. त्यामुळे ह्या रस्त्याच्या मध्यभागी पडलेली भेग भविष्यात धोकादायक ठरू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून हा रस्ता सुरक्षित कसा बनवता येईल, या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असून हा खड्डा अपघाताला निमंत्रण ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95089 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..