दाभोळ ः टाकळ्याची बर्फी, भारंगीची खीर, मायाळूचे आप्पे, सुरणाचे पेढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः  टाकळ्याची बर्फी, भारंगीची खीर, मायाळूचे आप्पे, सुरणाचे पेढे
दाभोळ ः टाकळ्याची बर्फी, भारंगीची खीर, मायाळूचे आप्पे, सुरणाचे पेढे

दाभोळ ः टाकळ्याची बर्फी, भारंगीची खीर, मायाळूचे आप्पे, सुरणाचे पेढे

sakal_logo
By

टाकळ्याची बर्फी, मायाळूचे आप्पे, सुरणाचे पेढे
कल्पनेपलीकडील पाककृती ;शेवग्याचे सूप,भारंगीची खीर सरस
दाभोळ, ता. ११ ः टाकळ्याची बर्फी, भारंगीची खीर, मायाळूचे आप्पे आणि सुरणाचे पेढे अशा कल्पनेपलीकडील २९ पाककृती समोर होत्या. निमित्त होतं डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली आणि विस्तार शिक्षण विभाग, कृषी महाविद्यालय दापोली यांनी आयोजित केलेल्या रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धेत रामराजे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य कुणाल मंडलिक यांना परीक्षणाचे आव्हानच मिळालं होते. अखेरीस अनोख्या रानभाज्यांच्या अनोख्या चवीत शेवग्याचे सूप सरस ठरले तर उर्वरित सर्वच पाककृतींना उपस्थितांची वाहवा मिळाली.
दुर्मिळ होत चाललेल्या रानभाज्या व त्यांचे औषधी गुणधर्म यांचे महत्व पटण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली आणि विस्तार शिक्षण विभाग, कृषी महाविद्यालय दापोली यांनी रानभाज्यांचे प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात ५१ रानभाज्या आणि त्यांच्या तब्बल २९ पाककृती स्पर्धकांनी सादर केल्या. यामध्ये टाकळ्याची वडी आणि बर्फी, कर्टोलीचे भरीत आणि चाट, कुर्डु टाकळा भजी, कुर्डूचे डोनट, कटलेट आणि वड्या टाकळ्याचा पराठा, मायाळूचे आप्पे आणि थालीपीठ, रानभाज्यांचे मंचुरियन आणि कटलेट, भारंगीची खीर, पॅटीस, वडे आणि कोफ्ता करी, सुरणाचे पेढे, अळूची देठी आणि गाठी, कुर्डुची ईडली व सँडविच आणि शेवग्याच्या पानाचे सूप अशा आगळ्यावेगळ्या पाककृती या वेळी मांडल्या होत्या. या स्पर्धेमध्ये गार्गी सावंत यांच्या शेवग्याचे सूप, स्नेहा तोरणे यांची सात्विक अळू देठी, निधी नाईक यांची भारंगीची खीर यांनी अव्वल तीन क्रमांक पटकावले तसेच आर्या शिगवण यांचे मायाळूचे आप्पे आणि साक्षी भोसले यांचे रानभाज्यांचे मंचुरियन या उत्तेजनार्थ पाककृती ठरल्या.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या माजी संचालिका डॉ. इंदू सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कुलगुरू डॉ. संजय सावंत, विस्तार शिक्षण संचालक डॉ. उत्तम महाडकर, संशोधन संचालक डॉ. संजय भावे, सहयोगी अधीष्ठाता डॉ. भरत साळवी, विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. प्रमोद सावंत हे उपस्थित होते. या वेळी डॉ. योगेश परूळेकर यांनी मान्यवरांना रानभाज्यांची माहिती करून दिली. या प्रदर्शनाला विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी व पर्यटकांसह अमेरिकेतील नॉर्थ करोलिना विद्यापीठातील लॉक रसेल यांनी भेट दिली.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95100 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..