संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

सामूहिक प्रवेशपरीक्षेत
कृषी महाविद्यालयाचे यश
चिपळूण ः शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सामूहिक प्रवेशपरीक्षेमध्ये देदिप्यमान यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवला आहे. यामध्ये अलजो जेम्स-वनस्पती रोगशास्त्र विभाग अपर्णा के, भाजीपाला विज्ञान विभाग समृद्धी विभुते, वनस्पती रोगशास्त्र विभाग ऐश्वर्या विचारे व स्नेहा जोग, काढणीपश्चात तंत्रज्ञान विभाग सिद्धी नाईक, जेनेटिक्स व वनस्पती प्रजनन विभाग संजय वाघमोडे, कृषी विस्तार विभाग ऋषिकेश कोंडुसकर व सौरभ जाधव, कृषी व्यवसाय व्यवस्थापन विभाग आदींचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील व प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.

खेड तायक्वांदो ॲकॅडमीचे यश
खेड ः जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा देवरूख येथील मराठा भवन हॉलमध्ये झाल्या. या स्पर्धेमध्ये खेड तायक्वांदो स्पोर्टस् ॲकॅडमीच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत पदकांची कमाई केली. त्यामध्ये सोहम खामकर, जैद हमदुले, सफदर पांगारकर, समर्थ सकपाळ, आर्यन शिबे, निधी मोरे यांनी सुवर्णपदक पटकावले तर शेवटच्या दिवशी खास आकर्षण राहिलेल्या सीनियर स्पर्धेमध्ये हर्षदा पार्टे हिने ४६ किलो गटामध्ये सुवर्णपदक पटकावून सीनिअर मुलींमध्ये बेस्ट फायटरचा किताब पटकावला तर सिद्धार्थ वायकर याने ज्युनिअर व सीनिअर अशा दोन्ही गटात सुवर्णपदक पटकावत ज्युनिअर गटामध्ये बेस्ट फायटरचा किताब तसेच सीनिअर गटामध्येदेखील बेस्ट फायटरचा किताब पटकावला. आदित्य चव्हाण याने रौप्यपदक तर जयान हमदुले, रोही तांबे, श्रुष्टी भुवड, हृतिक कदम, तन्मय सकपाळ यांनी कास्यपदकांची कमाई केली. असे एकूण ९ सुवर्ण १ रौप्य तर ५ कास्यपदकांची कमाई केली.

rat11p2.jpg ः22L49385 देवरूख ः शिल्पा मुंगळे यांचा ओरिसा सरकारतर्फे सन्मान करताना मान्यवर

नृत्य शिरोमणी पुरस्काराने शिल्पा मुंगळे सन्मानित
साडवली ः देवरूख येथील ललित कला अॅकॅडमीच्या प्राचार्या नृत्यअलंकार शिल्पा मुंगळे यांना ओरिसा सरकारचा नृत्य शिरोमणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंटरनॅशनल उमंग डान्स फेस्टिवल ओरिसा सरकारने आयोजित केला होता. या महोत्सवात महाराष्ट्रातील देवरूखच्या नृत्य अलंकार शिल्पा मुंगळे यांची दखल घेतली गेली. मुंगळे या कथ्थक नृत्यासाठी प्रसिद्ध आहेत. मनिषा साठे व मनिषा जोशी या त्यांच्या गुरू आहेत. आजवर मुंगळे यांनी कलापर्ण पुरस्कार, गुरूवर्य सन्मान, नाट्य कलाश्री पुरस्कार मिळवले आहेत. अखंड घुंगरूनाद हा विशेष कार्यक्रम गाजला आहे. कथ्थक नृत्यामध्ये त्यांनी अनेक कलाकार घडवले आहेत. नृत्य शिरोमणी पुरस्कार मिळाल्याबद्दल मुंगळे यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
-----------

rat11p10.jpg ः KOP22L49406 साडवली ः दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी-शिवणे येथील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करताना उद्योजक दादा सैतवडेकर, सोबत शांताराम भुरवणे.

होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचालित दादासाहेब सरफरे विद्यालयातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम भुरवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक दादा सैतवडेकर यांची उपस्थिती लाभली. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे चिटणीस शरद बाईत,ललित लोटणकर, दिनेश जाधव, सचिन मोहिते, राजेंद्र पोरे, रवींद्र रजपूत, दुर्वा भुरवणे, शांताराम जाधव उपस्थित होते. ज्या विद्यार्थ्यांचा आधार हरपला तसेच होतकरू विद्यार्थ्यांना दप्तर, गणवेश, वह्या, कंपास बॉक्स आणि वर्षभर बसचा पास देण्यात आला आहे. सुमारे 70 हून अधिक विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित करण्यात आले.

rat11p21.jpg ःKOP22L49446
चिपळूण ः येथील डीबीजे महाविद्यालयातर्फे प्रकाश गांधी यांचा सत्कार करण्यात आला.

प्रकाश गांधी यांचा सत्कार
चिपळूण ः शिक्षणातून विद्यार्थ्यांनी सुसंस्कार आत्मसात करून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे आवश्यक आहे, असे मत आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रकाश गांधी यांनी व्यक्त केले. डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नामदेव तळप यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक घडण्यासाठी थोर विचारवंत, तत्वज्ञ यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन व्यक्तीमत्व विकास साध्य करा, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95130 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..