रत्नागिरी- सुमेध वडावाला यांना साहित्यश्री पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सुमेध वडावाला यांना साहित्यश्री पुरस्कार प्रदान
रत्नागिरी- सुमेध वडावाला यांना साहित्यश्री पुरस्कार प्रदान

रत्नागिरी- सुमेध वडावाला यांना साहित्यश्री पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

rat११p२६.jpg-KOP२२L४९४८३ मुंबई : सुमेध वडावाला यांना साहित्यश्री पुरस्कार प्रदान करताना कुमार केतकर, राजीव खांडेकर आदी.

सुमेध वडावाला यांना
साहित्यश्री पुरस्कार प्रदान
रत्नागिरी, ता. ११ ः ज्येष्ठ साहित्यिक सुमेध वडावाला यांना युवक बिरादरीचा साहित्यश्री पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
रवींद्र नाट्यमंदिरच्या मिनी थिएटरमध्ये शनिवारी झालेल्या ''युवक बिरादरी ऋणानुबंध समारोहा''त ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते साहित्यश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, राजीव खांडेकर , डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. राजन वेळुकर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे आदी उपस्थित होते.
कथा, कादंबरी, आत्मकथा अशा वेगवेगळ्या वाङ्मयप्रकारावर पकड असलेल्या वडावाला यांनी धर्मयुद्ध, पुस्तक उघडलं, बावन्नकशी हा कथासंग्रह, तृष्णा, ब्रह्मकमळ या कादंबऱ्या, आई ती आईच सारखे आत्मकथनपर लेखन, दोन चाकं झपाटलेली हे प्रवासवर्णन अशा विविध साहित्यप्रकारात विपुल लेखन केले आहे. २०१३ ला खेड येथे भरलेल्या एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही वडावाला यांनी भूषवले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95132 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..