विजयदुर्ग परिसरात गणरायांचे विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयदुर्ग परिसरात गणरायांचे विसर्जन
विजयदुर्ग परिसरात गणरायांचे विसर्जन

विजयदुर्ग परिसरात गणरायांचे विसर्जन

sakal_logo
By

विजयदुर्ग परिसरात गणरायांचे विसर्जन
देवगड ः ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशी साद घालत अनंत चतुर्दशीला भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. विजयदुर्गसह गिर्ये, पडेल आदी भागात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. विजयदुर्ग समुद्र चौपाटीवर मोठ्या गणपतींचे विर्सजन करण्यात आले. तर गिर्ये, पडेल येथे पारंपरिक पध्दतीने अनेक घरगुती गणपतींचे विर्सजन विहिरीत, तळ्यात करण्यात आले. आरत्या करून व गार्‍हाणे घालून भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. आनंदी वातावरणात तसेच फटाक्यांच्या आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात लेझिमचा ठेका धरत मिरवणुका काढण्यात आल्या. यावर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी विजयदुर्ग पंचक्रोशीत आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95133 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..