शिक्षकांना अशैक्षणिक कामे नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांना अशैक्षणिक कामे नको
शिक्षकांना अशैक्षणिक कामे नको

शिक्षकांना अशैक्षणिक कामे नको

sakal_logo
By

49498
सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करताना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ पदाधिकारी.

शिक्षकांना अशैक्षणिक कामे नको

संघटनेची मागणी; सावंतवाडीत केसरकरांशी चर्चा

ओरोस, ता. ११ ः शालेय पोषण आहार योजनेचे काम स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे वीज बिल भरण्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतन व वैद्यकीय बिलांसाठी पुरेसे अनुदान उपलब्ध करून द्यावे. शिक्षकांचे वार्षिक अध्यापन नियोजनाचा विचार करून उपक्रम ठरवावे. बढती प्रक्रिया विनाविलंब करावी. प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे. तसेच कोरोना महामारीत जीव गमावलेल्या शिक्षकांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती तातडीने द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय प्रलंबित प्रश्नांबाबत लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्या माध्यमातून भेट घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, सरचिटणीस बाबाजी झेंडे, प्रमोद पावसकर, एकनाथ जानकर, महेश पालव, संजय शेडगे, विजय गावडे, मनोहर परब, आर. बी. गावडे, कृष्णा गावडे, शिवराज सावंत, शर्वरी सावंत, रुपाली सलामवडे, संगीता सोनटक्के, प्रकाश गावडे, रवींद्र गवस आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांची पदे तातडीने भरली जातील, असे शिक्षणमंत्री केसरकर यांनी आश्वासित केल्याचे जिल्हाध्यक्ष कविटकर यांनी सांगितले.
यावेळी मंत्री केसरकर यांना दिलेल्या निवेदनात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या डीसीपीएसबाबतच्या आर्थिक तफावती दूर करावी, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक (उपशिक्षक), पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी इत्यादी रिक्त पदे तत्काळ भरावीत आदी मागण्या केल्या आहेत.
................
चौकट
स्वतंत्र डेटा ऑपरेटर द्यावा
केंद्रस्तर शाळेत ऑनलाईन कामकाजासाठी इंटरनेट सुविधा व स्वतंत्र डेटा ऑपरेटर द्यावा. पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व शाळांना मुख्याध्यापक पद मंजूर करावे, प्राथमिक शिक्षकांना रजा रोखीकरणाचा लाभ द्यावा, पहिली ते ते सातवीच्या सर्व शाळांना एसएसएअंतर्गत शाळा अनुदान म्हणून मिळणारी रक्कम पटसंख्येची अट न ठेवता २५ हजार रुपये करावी व सर्व पहिली ते पाचवीच्या शाळांना १५ हजार रुपये करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95149 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..