चिपळूण ः कचरा नागरिक स्वच्छतेबाबत जागरूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः कचरा नागरिक स्वच्छतेबाबत जागरूक
चिपळूण ः कचरा नागरिक स्वच्छतेबाबत जागरूक

चिपळूण ः कचरा नागरिक स्वच्छतेबाबत जागरूक

sakal_logo
By

rat१११५.txt

बातमी क्र..१५ ( पान ५ मेन )

काही सुखद .............................लोगो

rat११p१२.jpg ः KOP२२L४९४३७चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे ठेवलेल्या निर्माल्य कलशात कचरा टाकताना गणेशभक्त.

rat११p१३.jpg ःKOP२२L४९४३८ चिपळूण शहरातील गांधारेश्वर येथील निर्माल्य कलशात कचरा टाकताना गणेशभक्त.

rat११p१४.jpg ः KOP२२L४९४३९ कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करताना पालिकेचे कर्मचारी. (मुझफ्फर खान ः सकाळ छायाचित्रसेवा)
...........................

नदी, तलाव, विहिरींचे टाळले प्रदुषण
चिपळूणकर जागरूक, गणेश विसर्जनावेली एक टन निर्माल्यांचे संकलन


पॉइंटर
* ८ ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले
* स्वतःहून कलशात कचरा टाकत होते
* सफाई कामगार ठेवावा लागला नाही
* धर्माधिकारी प्रतिष्ठानचेही उत्तम काम

चिपळूण, ता. ११ ः गणेश विसर्जनदरम्यान नदी, तलाव आणि विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकले जाते. त्यामुळे नदी प्रदुषणात वाढ होते. ते टाळण्यासाठी चिपळूण पालिकेने यावर्षी ८ ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले होते. नागरिकांनी कचरा नदीत न टाकता स्वतःहून या कलशात टाकला त्यामुळे शहरातील नागरिकानी या गणेशोत्सवात तरी स्वच्छतेबाबत जागरूकता दाखविल्याचे आढळून आले.
नदी प्रदूषण टाळण्यासाठी पालिका नागरिकांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करत आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांनी नदी प्रदूषण टाळावे यासाठी जनजागृती केली. त्यामुळे शहरातील नागरिक आता स्वच्छतेला प्राधान्य देत आहेत. यापूर्वी निर्माल्य कलश ठेवल्यानंतर तेथे पालिकेचे कर्मचारी व स्वयंसेवक ठेवले जात होते. नागरिकांना या कलशामध्ये आपला कचरा टाका, असे सांगावे लागत होते; मात्र यावर्षी पालिकेने गोवळकोट शिंदे पाखाडी, बाजारपूल, रामतीर्थ तलाव, गांधारेश्वर, बहादूरशेख नाका, पागमळा आदी आठ ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवले होते. त्या ठिकाणी स्वतःहून कचरा टाकत होते. त्यामुळे निर्माल्य कलश असलेल्या ठिकाणी पालिकेला सफाई कामगार ठेवण्याची वेळच आली नाही. यावर्षी पालिकेचे सफाई कर्मचारी विसर्जन काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून पहारा देत होते. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पालिकेकडे १ टन निर्माल्य जमा झाले.
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सकाळपासूनच पालिकेचे कर्मचारी शहरातील वेगवगेळ्या घाटांवर उपस्थित झाले होते. रात्री उशिरापर्यंत स्वयंसेवक घाटांवर थांबले. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना जलप्रदूषणाचे गांभीर्य सांगून स्वंयसेवक त्यांच्याकडील निर्माल्य आणि फळे निर्माल्य कलशात टाकण्याची विनंती करत होते. पालिकेचे आरोग्यनिरीक्षक महेश जाधव म्हणाले, यावर्षी शहरातील बहुतांशी नागरिकांनी निर्माल्य कलशात कचरा टाका, असे सांगण्याची वेळ आली नाही. गेल्या पाच वर्षांत याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे यावर्षी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्य गोळा केले जात होते.
.............

कोट
गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले. विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर आम्ही तातडीने स्वच्छतेकडे लक्ष दिले. रस्त्यावर तयार झालेला कचराही उचलला. निर्माल्य कलशात गोळा झालेल्या कचऱ्यापासून नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सेंद्रिय खत तयार केला जाणार आहे.

- महेश जाधव, आरोग्य निरिक्षक चिपळूण पालिका
.............
चौकट
कृत्रिम तलावाबाबत उत्साह कमीच
जल प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेने पेठमाप आणि बहादूरशेख नाका येथे कृत्रिम तलाव तयार केले होते. नागरिकांनी या तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करून जलप्रदूषण टाळावे, असे आवाहनही करण्यात आले होते; मात्र चिपळूण पालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि श्री सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ चिपळूण या दोनच मंडळाच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95157 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..