देवरूख ः जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे प्रयत्न
देवरूख ः जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे प्रयत्न

देवरूख ः जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे प्रयत्न

sakal_logo
By

जिल्हाप्रमुख पदासाठी
बापू म्हाप की सदानंद चव्हाण
शिंदे गटाची ताकद वाढवण्यावर भर ; शिवसेनेपुढे आव्हान
संगमेश्वर, ता. ११ ः रत्नागिरी जिल्ह्यातही शिंदे गटाने जोरदार हातपाय पसरायला सुरवात केली आहे. उत्तर रत्नागिरीतही जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख लवकरच नियुक्ती केली जाणार असून जिल्हाप्रमुख पदावर सामंत याचे खंदे समर्थक बापू म्हाप व नुकतेच शिंदे गटात सामिल झालेले माजी आमदार सदानंद चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे यांची नसून आमचीच खरी शिवसेना आहे, असे सर्व शिंदे समर्थकांना वाटते. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत व ज्येष्ठ नेते रामदास कदम हे शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्यास आतूर झाले असताना ठाकरेनिष्ठ शिवसैनिकांनी सामंत यांच्या दौऱ्यात काही ठिकाणी आंदोलन केले. त्या सैनिकांचा नुकतेच उपनेते झालेल्या आमदार राजन साळवी यांनी सत्कारही केला.यातून आगामी काळात दोन्ही गटातील संघर्ष वाढत चालला आहे.
शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम व रत्नागिरीचे आमदार व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या रूपाने एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून दोन मोहरे सुरवातीलाच मिळाले आहेत. जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्याचा विडा उचललेल्या या दोन्ही नेत्यांनी येत्या काही दिवसात जिल्ह्यातून आणखी काही बडे नेते शिंदे गटात दाखल होणार असल्याचे जाहीर करत काही दिग्गजांच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. रामदास कदम व उदय सामंत हे शिवसेनेतील जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. 10 वर्षे आमदारकी भोगलेले माजी आमदार सदानंद चव्हाण हे आपल्या काही निवडक सहकारी यांच्यासह सामंतांच्या उपस्थितीत शिंदे गटात सामिल झाल्याने हे दोन्ही नेते शिवसेना फोडण्यात यशस्वी होत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
सामंत यांना जिल्ह्यातील विशेषतः रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर व चिपळूण या तालुक्यात शिवसैनिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत व सेनेत विविध पदे सांभाळली आहेत. त्यांचा जनसंर्पकही दांडगा आहे. आता शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी सामंत हे या पाच तालुक्यांवर तर ज्येष्ठ नेते रामदास कदम हे दापोली, मंडणगड, खेड व गुहागर या चार तालुक्यासह जिल्हात लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याच सूचनेनुसार शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख नियुक्त झाले आहेत. जिल्हाप्रमुख पदावर माजी जिल्हाप्रमुख पद भूषवलेले शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती केली गेली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95159 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..