राजापूर ः रिफायनरीचा वाद जवळून बघण्यासाठी राजापूर दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः  रिफायनरीचा वाद जवळून बघण्यासाठी राजापूर दौरा
राजापूर ः रिफायनरीचा वाद जवळून बघण्यासाठी राजापूर दौरा

राजापूर ः रिफायनरीचा वाद जवळून बघण्यासाठी राजापूर दौरा

sakal_logo
By

rat1133.txt

बातमी क्र.. 33 ( पान 2 मेन )

rat11p30.jpg - KOP22L49509
राजापूर ः काँग्रेसचे प्रदेशाधक्ष नाना पटोले यांच्या भेटीच्यावेळी उपस्थित रिफायनरी प्रकल्प समर्थक समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर, अनामिका जाधव आदी.

रिफायनरीचा वाद जवळून बघण्यासाठी राजापूर दौरा
प्रदेशाध्यक्ष पटोले; प्रश्न सोडवण्यासाठी घेतला समजावून
राजापूर, ता. 11 ः कोकणाचा विकास व्हावा ही सर्वांची मनापासून इच्छा आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमीच विकासासोबत राहिलेला आहे. गेल्या साठ वर्षात या देशात सूईपासून रॉकेटपर्यंतची क्रांती काँग्रेसने घडवलेली आहे. लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम काँग्रेसने केलेले आहे. विकासाच्या गोष्टी येतात तेथे काँग्रेस पक्ष पुढे येत. काँग्रेस पक्ष विकासासोबत राहिला आहे आणि राहणार आहे. रिफायनरी प्रकल्पावरून सध्या समर्थन आणि विरोध असा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून रिफायनरीचा वाद जवळून बघण्यासाठी व त्याला कसे सोडवता येईल यासाठी आजचा आपला दौरा असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज रिफायनरी समर्थकांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले.
प्रकल्पसमर्थकांनी निवेदन केल्यानंतर बोलताना नाना पटोले यांनी प्रकल्पसमर्थकांशी संवाद साधला व आपले मनोगत व्यक्त केले. नाणारचा विषय कसा गायब झाला, हे सर्वांना माहित आहे. आता नव्या जागेत रिफायनरीचे नवे बाळ जन्माला आले आहे. त्या ठिकाणीही समर्थन-विरोध अशी स्थिती आहे. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून रिफायनरीचा वाद जवळून बघण्यासाठी व त्याला कसे सोडवता येईल यासाठी आजचा आपला दौरा आहे. कोकणला निसर्गाने भरभरून दिलेले आहे; मात्र कोकणातील तरुणांना आपला गाव, तालुका सोडून चाकरमानी म्हणून मुंबईला का जावे लागते याचा विचारदेखील करणे आवश्यक बनले आहे. माजी मंत्री भाईसाहेब हातणकर यांनी कोकणला पुढे नेण्यासाठी केलेले काम आजही कोकणातील जनता विसरलेली नाही. आम्ही तरुण पिढी हाच वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. मुंबईत येऊन कोणी काय सांगावे आणि वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे जवळून पाहण्यासाठी आपण येथे आलो आहोत. या वेळी नंदकुमार चव्हाण, पंढरीनाथ आंबेरकर, एजाज बांगी यांनी जमीनमालकांची संमती असल्याने व प्रकल्पाला विरोध करणारी एकाही जमीनमालकाची लेखी तक्रार नसल्याने नेमका विरोध कोणाचा आहे ते तपासण्यात यावे, अशी मागणी केली. चव्हाण यांनी जातीपातीच्या राजकारणात प्रकल्पाला गुरफटवल्यास कोकणात वेगळाच पायंडा पडेल, असे सांगितले.
येथील शासकीय विश्रामग्रह येथे पटोले यांच्याशी प्रकल्प समर्थकांनी चर्चा केली. या भेटीच्यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर उपस्थित होते.

चौकट
विरोध करणारी गावे वगळा
या वेळी धोपेश्वर-बारसू येथील स्थानिक जमीनमालकांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी आम्ही आमची साडेतीन हजार एकर जमीन देऊ केल्याची माहिती पटोले यांना दिली. काही एनजीओ आणि जमीनमालक नसलेले लोक प्रकल्पाला विरोध असल्याचे भासवत आहेत याकडे बारसूतील ग्रामस्थ विनायक कदम यांनी पटोले यांचे लक्ष वेधले तर रिफायनरी प्रकल्प समर्थक समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश शिवलकर यांनी केवळ धोपेश्वर बारसू आणि गोवळ या दोन गावांत प्रकल्प साकारू शकत असल्याने प्रकल्पाला विरोध करणारी शिवणेखुर्द, देवाचेगोठणे आणि सोलगांव ही गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी पटोले यांच्याकडे केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95162 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..