पान एक-विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविले
पान एक-विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविले

पान एक-विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविले

sakal_logo
By

टीपः swt1117.jpg
49521
न्हावेली ः पिंजऱ्यात जेरबंद केलेल्या बिबट्यासह वनविभागाचे पथक.

विहिरीत पडलेल्या
बिबट्याला वाचविले

न्हावेलीत तीन तासांच्या थरारानंतर वन विभागास यश

सावंतवाडी, ता. ११ ः न्हावेली-नागझरवाडी येथील रुपेश सावळ यांच्या घराशेजारील ४० फूट खोल चिरेबंदी विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान दिले. सुमारे तीन तासांच्या थराराक प्रयत्नांनंतर बचाव पथकाने लोखंडी पिंजऱ्‍याच्या साहाय्याने त्याला विहिरीबाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. रात्रीच्या अंधारात कोंबड्या किंवा भटक्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी आलेला हा बिबट्या काळोखात अंदाज न आल्यामुळे विहिरीत पडला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला.
न्हावेली-नागझरवाडी येथील श्री. सावंत यांना आज सकाळी ९ वाजता घराशेजारील विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. ही खबर त्यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी क्षीरसागर यांच्यासह कडावल वनपरिक्षेत्र अधिकारी अमित कटके हे बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याने जीव वाचविण्यासाठी विहिरीतील खोबणीचा सहारा घेतला होता. ही खोबण विहिरीच्या भिंतीत गुहेप्रमाणे ३ ते ४ फूट आतपर्यंत पोकळ आहे. त्यात बिबट्या लपून बसला होता. बघ्यांची वाढत असलेली गर्दी, खोबणीत दडून बसलेला बिबट्या आणि वरून सतत पडत असलेला मुसळधार पाऊस या सर्व आव्हानांचा वन विभागाच्या पथकाला सामना करावा लागला. अखेर तीन तासांच्या प्रयात्नांनंतर या सर्व आव्हानांवर संयमाने मात करत यशस्वीरित्या लोखंडी पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
हा बिबट्या अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा नर जातीचा होता. बाहेर काढल्यानंतर त्याची वन्यजीव वैद्यकीय डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी तो पूर्णतः निरोगी असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या मोहिमेत ग्रामस्थांनीही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोलाची साथ दिली. हे बचावकार्य उपवनसंरक्षक सावंतवाडी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर, वनक्षेत्रपाल कडावल अमित कटके, वनपाल महेश पाटील, वनरक्षक आप्पासो राठोड, दत्तात्रय शिंदे, महादेव गेजगे, संग्राम पाटील, सागर भोजने, प्रकाश रानगिरे, रामदास जंगले, राहुल मयेकर या सर्वांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95180 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..