क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम
क्राईम

क्राईम

sakal_logo
By

कोळवलीतील ३५ वर्षीय तरुण बेपत्ता
गुहागर ः तालुक्यातील कोळवली गावातील ३५ वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी तो गणपती विसर्जनासाठी जयगड खाडीकिनाऱ्यावर गेला होता. ग्रामस्थ तरुणाचा शोध घेत असून समुद्रकिनाऱ्याकाठच्या गावांमध्येही शोधमोहीम सुरू आहे. महेश कृष्णा भुवड असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी (ता. ९) महेश ग्रामस्थांसह कोळवलीत जयगड खाडीकिनारी गणपती विसर्जनासाठी गेला होता. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जन करून परत येत असताना महेश पाय घसरून खाडीत पडला. महेशला पोहता येत नव्हते. महेश बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तातडीने ग्रामस्थांनी खाडीकिनारी शोध घेतला; मात्र रात्रीपर्यंत महेश सापडला नाही. अखेर या घटनेची खबर गुहागर पोलिस ठाण्यात देण्यात आली. महेश भुवड बेपत्ता असल्याची नोंद गुहागर पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी जयगड खाडीकिनाऱ्याबरोबर समुद्रकिनाऱ्याकाठच्या गावामध्ये महेश भुवड बेपत्ता असल्याची माहिती पोचवली आहे.
------

जगबुडी नदीपात्रात आढळलेल्या वृद्धेचा मृत्यू
खेड ः शहरानजीक जगबुडी नदीपात्रात गुरुवारी (ता. ८) १२.४५ वाजण्याच्या सुमारास मटण मार्केटनजीक वृद्ध महिला पाण्यात तरंगताना आढळून आली. तिला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे. चंद्रभागा दगडू मोरे (वय ६५, रा. मोहाने तळावाडी खेड) असे मृत महिलेचे नाव असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95187 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..