दाभोळ ः आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा 16ला दापोलीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा 16ला दापोलीत
दाभोळ ः आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा 16ला दापोलीत

दाभोळ ः आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा 16ला दापोलीत

sakal_logo
By

फोटो : rat११p२७.jpg ः KOP२२L४९४९० दापोली ः पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आमदार सूर्यकांत दळवी.


आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा शुक्रवारी दापोलीत
---
सूर्यकांत दळवी; शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांचा घेणार समाचार
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ११ ः संपूर्ण राज्यभर सुरू असलेली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा १६ सप्टेंबरला दापोलीत येणार असून या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले, अशी माहिती दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदारांचा समाचार घेण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण राज्यामध्ये निष्ठायात्रेचे आयोजन केले आहे. मुंबई येथून सुरू झालेली ही यात्रा मराठवाडा, खानदेश नंतर कोकण विभागात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी कोकणातील रायगड जिल्ह्याचा दौरा केला होता. गणेशोत्सवानंतर ही यात्रा पुन्हा सुरू होत असून या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे.
१६ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता वाकवली येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत दापोली मतदार संघाच्यावतीने करण्यात येणार असून, तेथून बाईक रॅलीने त्यांचे दापोलीत आगमन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सभास्थानी येणार आहेत. या वेळी त्यांच्यासमवेत माजी पालकमंत्री, शिवसेना सचिव अनिल परब, माजी खासदार अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, उपनेते अमोल किर्तीकर उपस्थित असणार आहेत.
दळवी म्हणाले, ‘दापोली विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून २०१४ मध्ये या मतदार संघात प्रथम गद्दारी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर या मतदारसंघात गद्दारीची कीड वाढत गेली असून, नुकत्याच झालेल्या सत्ताबदलामध्ये या मतदार संघाच्या आमदारांनी उघड गद्दारी केली आहे. मातोश्रीवर टीका करण्यापर्यंत मजल आतापर्यंत शिवसेनेत विविध पदे भोगलेल्या रामदास कदमांची गेली असून, या सर्वाचा समाचार या दौऱ्यात घेतला जाणार आहे. दापोली विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेला पोषक वातावरण असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसेनिकांमधील संभ्रम दूर होईल व पुन्हा नव्या जोमाने शिवसेना या मतदार संघात पाय रोवून उभी राहिल.’
या पत्रकार परिषदेला दापोली विधानसभा मतदार संघाचे मुंबई संपर्कप्रमुख रूपेश बेलोसे, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, शहरप्रमुख संदीप चव्हाण, उपशहरप्रमुख विक्रांत गवळी, माजी तालुकाप्रमुख शांताराम पवार, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, सागर करमरकर, उमेश शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95189 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..