रत्नागिरी- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त
रत्नागिरी- संक्षिप्त

रत्नागिरी- संक्षिप्त

sakal_logo
By

रत्नागिरीत गणेशोत्सव शांततेत
रत्नागिरी ः कोरोनाच्या निर्बंधानंतर यावर्षी मोठ्या दिमाखात जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा झाला. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते; मात्र नागरिकांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता शांततापूर्ण वातावरण ठेवत यावर्षी गणेशोत्सव साजरा करून पोलिसदलाला सहकार्य केले म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे व शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. या गणेशोत्सवात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्थाच्या सभा घेऊन नागरिकांना उत्साहाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहनदेखील करण्यात आले होते. मुळात रत्नागिरी जिल्हा हा शांतप्रिय जिल्हा आहे. जिल्ह्याच्या या नावलौकिकाला साजेसे असे वर्तन करत नागरिकांनी हा उत्सव केल्याबद्दल पोलिसदलाकडून नागरिकांचे आभार मानण्यात आले आहेत.

राजिवडा किनाऱ्यावर नांगरलेली नौका बुडाली
रत्नागिरी ः शहरातील भाट्ये खाडीकिनारी असलेल्या राजीवडा नाका येथील जेटीलगत दगडावर आदळून यांत्रिकी नौका बुडाल्याची घटना बुधवारी (ता. ७) सकाळी सहाच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत नौकामालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. राजीवडा येथील रहिवासी इम्तियाज पावसकर यांच्या मालकीची ही नौका आहे. वादळी वाऱ्यामुळे नौका समुद्रात न जाता खाडीकिनारी नांगरावरच होती. जोरदार लाटांच्या तटाख्याने ही नौका खडकांवर आदळ्याने ती फुटली. त्यामुळे नौकेमध्ये समद्राचे पाणी भरून ती बुडाली. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र नौकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नौका बुडाल्याची माहिती मत्स्यखाते आणि पोलिसांना देण्यात आली आहे. नौका बुडाल्याची नोंद मत्स्यखात्यानेही केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95190 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..