माथेरानमध्ये पर्यटकांची वाट बिकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरानमध्ये पर्यटकांची वाट बिकट
माथेरानमध्ये पर्यटकांची वाट बिकट

माथेरानमध्ये पर्यटकांची वाट बिकट

sakal_logo
By

माथेरानमध्ये पर्यटकांची वाट बिकट
माथेरान ः राज्यातील बहुतांश भागांत सध्या मेघगर्जनेसह येणाऱ्या पावसाने कहर केला आहे. माथेरानमध्येदेखील ७ सप्टेंबर रोजी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. या पावसात शहराला जोडणारा मुख्य रस्ता वाहून गेल्याने एमएमआरडीएने करोडो रुपयांचा केलेला खर्च वाया गेला आहे. माथेरान शहरात सध्या एमएमआरडीएकडून १२३ रुपये खर्चून वाहनतळ, चार पॉईंट, घाटरस्ता आणि माथेरान प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीपासून महात्मा गांधी मार्ग ही कामे सुरू आहेत. त्यातील महात्मा गांधी मार्गाचे काम अर्धवट झाले असून माथेरान रेल्वे स्थानकापर्यंत हा रस्ता गॅबियन आणि क्ले-पेव्हर ब्लॉक बसवून तयार करण्यात आला. त्यापैकी सखाराम तुकाराम पॉईंटपासून अमन लॉज स्थानकाकडे जाणारा रस्ता पावसामुळे काही ठिकाणी खचला आहे. या रस्त्यावरील क्ले-पेव्हर ब्लॉक पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहेत; तर ज्या ठिकाणी जास्त चढ उतार आहे, त्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे चर पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या कामाला पूर्ण होऊन जेमतेम सात ते आठ महिने झाले असल्याने एमएमआरडीएच्या देखरेखीखाली झालेल्या या रस्त्याच्या दर्जाबाबत स्थानिकांकडून आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95201 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..