शिवसेनेचे जिल्ह्यात 16 ला शक्तिप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे जिल्ह्यात 16 ला शक्तिप्रदर्शन
शिवसेनेचे जिल्ह्यात 16 ला शक्तिप्रदर्शन

शिवसेनेचे जिल्ह्यात 16 ला शक्तिप्रदर्शन

sakal_logo
By

- rat11p31.jpg
49527
रत्नागिरी ः आदित्य ठाकरे दौरा नियोजनासाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार राजन साळवी.

- rat11p32.jpg
49528
रत्नागिरी ः बैठकीला उपस्थित प्रमुख पदाधिकारी.


शिवसेना करणार शक्तिप्रदर्शन

आदित्य ठाकरेंचा शुक्रवारी दौरा; विरोधकांचेही लक्ष

रत्नागिरी, ता. ११ ः शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी राज्यभर दौरे करत वातावरण निर्मिती करण्यास आरंभ केला आहे. सिंधुदुर्ग आणि रायगडचे दौरे झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा कधी याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांचा हा दौरा निश्‍चित झाला असून, शुक्रवारी (ता. १६) रत्नागिरी, चिपळूण आणि दापोलीत त्यांच्या सभा होणार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शनासाठी शिवसैनिक सरसावले असून, रत्नागिरी तालुक्याची बैठक रविवारी (ता. ११) दुपारी झाली.
रत्नागिरी शहरातील शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात शिवसेना उपनेते आमदार डॉ. राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. आदित्य ठाकरेंची ‘निष्ठा यात्रा’ रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहे. रत्नागिरी शहरात सकाळी ही यात्रा दाखल होणार असून साळवी स्टॉप येथे सभेचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्हा परिषद गटातून शिवसैनिकांना निमंत्रित केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण यासह विभागप्रमुखांना सूचना दिल्या आहेत.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यामुळे आदित्य ठाकरे या दौऱ्‍यात काय बोलणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांच्या पश्‍चात चिपळूणचे नेतृत्व कुणाकडे दिले जाणार, रत्नागिरी विधानसभेची जबाबदारी कुणाकडे राहील याबाबत शिवसैनिकांमध्येही उत्सुकता आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मेळावा घेतलेला नाही. आदित्य यांच्या दौऱ्‍यानंतर शिंदे गटाचाही मेळावा होण्याची शक्यता आहे. आदित्य यांच्या दौऱ्‍यात कोण कोण सहभागी होणार यावरही लक्ष राहणार आहे.

---
चौकट
कोण कुठे... होणार स्पष्ट!
उद्योगमंत्री सामंत यांनी शिंदे गटाला साथ दिल्यानंतर शिवसेनेतील त्यांचे काही निकटवर्तीय अजूनही उघडपणे त्यांच्यासोबत गेलेले नाहीत. मात्र, आता आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्‍यात कोण कोण उपस्थिती लावणार आणि कोण शिंदे गटात सहभागी होणार, यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95202 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..