अप्लवयीन मुलीशी अनैतिक संबंध प्रकरणी युवकावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अप्लवयीन मुलीशी अनैतिक 
संबंध प्रकरणी युवकावर गुन्हा
अप्लवयीन मुलीशी अनैतिक संबंध प्रकरणी युवकावर गुन्हा

अप्लवयीन मुलीशी अनैतिक संबंध प्रकरणी युवकावर गुन्हा

sakal_logo
By

अप्लवयीन मुलीशी अनैतिक
संबंध प्रकरणी युवकावर गुन्हा
कणकवली, ता.११ ः अल्‍पवयीन मुलीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या परजिल्ह्यातील एका युवकावर आज पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्‍याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्‍यात घेतले आहे. तर अल्‍पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी ही माहिती दिली.
परजिल्ह्यातील एक युवक अल्‍पवयीन मुलीला घेऊन आज शहरातील एका रुग्णालयात तपासणीसाठी आला होता. यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती असल्‍याची बाब समोर आली. तसेच ती अल्‍पवयीन असल्‍याने रुग्णालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. कणकवली पोलिसांनी दोघांनाही ताब्‍यात घेतले. त्‍यानंतर अल्‍पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी केली. तिची लवकरच वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, तिला पालकांच्या स्वाधीन केले जाणार असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्‍यान, अनैतिक संबंध ठेवणाऱ्या युवकावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95228 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..