बांद्यातील पूरस्थितीची राष्ट्रवादीकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यातील पूरस्थितीची राष्ट्रवादीकडून पाहणी
बांद्यातील पूरस्थितीची राष्ट्रवादीकडून पाहणी

बांद्यातील पूरस्थितीची राष्ट्रवादीकडून पाहणी

sakal_logo
By

49563
बांदा ः येथे पूरस्थितीबाबत पोलिस निरीक्षक शामराव काळे यांच्याशी चर्चा करताना अर्चना घारे-परब. सोबत इतर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यातील पूरस्थितीची पाहणी

राष्ट्रवादीकडून दखल; अर्चना घारेंनी केली प्रशासनाशी चर्चा

बांदा, ता. ११ ः शहरातील आळवाडी भागात पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी कार्यकर्त्यांसह या ठिकाणी धाव घेत पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस केली. तसेच तत्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी पोलिस निरीक्षक शामराव काळे, तलाठी वर्षा नाडकर्णी यांच्याशी चर्चा करून प्रशासनाने तत्काळ सुविधा व मदतकार्य देण्याची मागणी केली.
बांदा शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने आज सकाळीच तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी आळवाडी बाजारपेठेत घुसले. याची माहिती मिळताच घारे-परब यांनी या ठिकाणी धाव घेत माहिती घेतली. येथील पूरस्थितीत मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लाईफ बोट, लाईफ जॅकेट देण्यात आली आहेत. तसेच पूर अलर्ट करण्यासाठी सायरन देखील बसविण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत प्रशासनाने दिलेल्या मदतीची त्यांनी लोकांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विनायक परब, वैभव परब, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रशांत गवस आदी उपस्थित होते. सकाळी ११.३० वाजता त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून तसेच स्थानिकांशी संवाद साधला. तलाठी वर्षा नाडकर्णी सकाळी ७ वाजल्यापासूनच येथील पूरस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना सतर्क करत असल्याचे समजल्यावर प्रशासनाच्या तत्परतेचे त्यांनी कौतुक केले. राष्ट्रवादीच्या माध्यमातून या ठिकाणी साहित्य दिले असून आवश्यक असेल त्यावेळी याचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दरवर्षी पूरस्थितीत येथील व्यापारी व नागरिकांना नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांदा शहरात शिरलेले पाणी चिखल व खराब असल्याने याठिकाणी रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर तत्काळ जंतूनाशक फवारणी करावी. तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे सांगितले. यावेळी त्यांनी पोलिस निरीक्षक शामराव काळे यांच्याकडून परिसरातील पूरस्थितीची माहिती घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95239 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..