रक्तदान शिबिरास नांदगावात प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्तदान शिबिरास 
नांदगावात प्रतिसाद
रक्तदान शिबिरास नांदगावात प्रतिसाद

रक्तदान शिबिरास नांदगावात प्रतिसाद

sakal_logo
By

टीपः swt११२८.jpg मध्ये फोटो आहे.
नांदगाव ः रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करताना मान्यवर.

रक्तदान शिबिरास
नांदगावात प्रतिसाद
नांदगाव, ता. ११ ः आशिकाने मुस्तफा कमिटी नांदगावतर्फे सलग चौथ्या वर्षी उर्दू शाळा येथे रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी, रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केले होते. रक्तदान शिबिरामध्ये ३० दात्यांनी रक्तदान केले. तसेच नागरिकांची नेत्रचिकित्सा व रक्तगट तपासणी करण्यात आली. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असलदेचे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी रक्तदान शिबिराला भेट देत शुभेच्छा दिल्या. तसेच कमिटीच्या सामाजिक कार्यक्रमांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्य मजिद बटवाले यांची शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याने कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी कमिटीचे अध्यक्ष इरफान साटविलकर, नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे, आसिफ बटवाले, आलिम बटवाले, रज्जाक बटवाले, आजीम नावलेकर, यासिर मास्के, हुसेन आंबर्डेकर, बाबा बटवाले आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95246 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..