जिल्ह्यात लवकरच ‘अंनिस’च्या शाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात लवकरच ‘अंनिस’च्या शाखा
जिल्ह्यात लवकरच ‘अंनिस’च्या शाखा

जिल्ह्यात लवकरच ‘अंनिस’च्या शाखा

sakal_logo
By

49585
कणकवली : येथील स्वामी आर्ट स्टुडिओमध्ये ‘अंनिस’च्या बैठकीस नंदकिशोर तळाशिलकर, कृष्णात स्वाती आदी.

जिल्ह्यात लवकरच ‘अंनिस’च्या शाखा

तळाशिलकर : महाराष्ट्र ‘अंनिस’ची कणकवलीत बैठक

कणकवली, ता.१२ : अंधश्रद्धा मोडीत काढणे तसेच समाजाला वैज्ञानिक पातळीवर आणण्यासाठी सिंधुदुर्गातही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या क्रियाशील शाखा लवकर स्थापन होतील, असा विश्‍वास संस्थेचे राज्‍य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशिलकर यांनी येथे व्यक्‍त केला.
शहरातील चित्रकार नामानंद मोडक यांच्या स्वामी आर्ट स्टुडिओमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक झाली. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंधश्रद्धा विषयक परिस्थिती, वास्तव चित्र आणि आपले निरीक्षण याबाबत उपस्थितांनी मते मांडली. त्‍यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशिलकर यांनी अंधश्रद्धांचे स्वरूप आणि कारणे याविषयी माहिती सांगितली. राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनीही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पंचसूत्री, व्यापक वैचारिक भूमिका, कार्यपद्धती आणि रचना आणि संघटित कामाचे महत्त्व याविषयी मांडणी केली. यावेळी नंदकिशोर तळाशिलकर यांनी काही चमत्कार सादर करून त्यामागील विज्ञान समजावून सांगितले. याबैठकीत ऑक्टोबर अखेरपर्यंत कणकवली येथे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करू इच्छिणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत काम करणारी क्रियाशील शाखा उभी करण्याचे ठरले. यासाठी परिसरातील शाळा, महाविद्यालये येथील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला आणि समविचारी कार्यकर्ते जोडून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करायचे ठरले. तसेच याच काळात कणकवली बरोबरच मालवण, देवगड, वैभववाडी, वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी येथे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन जिल्ह्यात जोमाने काम वाढवण्याचा संकल्प केला. या बैठकीसाठी नामानंद मोडक, अच्युत देसाई आणि शैलजा कदम यांनी विशेष प्रयत्न केले. या बैठकीला नामानंद मोडक, शैलजा कदम, नितीन वाळके, विनायक सापळे, मोहन कुंभार, विशाल गुरव, सुजय जाधव, काशिनाथ वर्देकर, श्रेयश शिंदे हे कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विजय परब यांनीही बैठकीला सदिच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95297 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..