हुमरमळा सरपंचांचे कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुमरमळा सरपंचांचे कौतुक
हुमरमळा सरपंचांचे कौतुक

हुमरमळा सरपंचांचे कौतुक

sakal_logo
By

कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या
‘फेस्टिव्हल स्पेशल’ला मुदतवाढ
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जबलपूर-कोईंबटूर-जबलपूर या साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल प्रवासी रेल्वेगाडीला मुदतवाढ मिळाली. पश्चिम मध्य रेल्वेच्या समन्वयाने धावणाऱ्या या गाडीला सिंधुदुर्गात कणकवली व कुडाळ स्थानकावर थांबा आहे. मॉन्सून कालावधीत (७ ते २८ ऑक्टोबर) जबलपूर-कोईंबटूर (०२१९८) दर शुक्रवारी रात्री साडेअकराला जबलपूर येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी सायंकाळी पाचला कोईंबटूर येथे पोहोचेल. मॉन्सून कालावधीत (१० ते ३१ ऑक्टोबर) कोईंबटूर- जबलपूर (०२१९७) दर सोमवारी दुपारी सव्वातीनला कोईंबटूर येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी पावणेनऊला जबलपूरला पोहोचेल. नॉनमॉन्सून कालावधीत (४ नोव्हेंबर ते २ जानेवारी २०२३) कोईंबटूर- जबलपूर दर शुक्रवारी रात्री पावणेबाराला जबलपूर येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी दुपारी २.४०ला कोईंबटूर येथे पोहोचेल. नॉनमॉन्सून कालावधीत (७ नोव्हेंबर ते २ जानेवारी) कोईंबटूर-जबलपूर दर सोमवारी सायंकाळी पाचला कोईंबटूर येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी पावणे नऊला जबलपूरला पोहोचेल. या गाडीला भुसावळ, नाशिक, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार आदी स्थानकांवर थांबा आहे.
---
हुमरमळा सरपंचांचे कौतुक
कुडाळ ः कुडाळ तालुक्यात शेतकऱ्यांची केवायसी सर्वप्रथम मुदतीत पूर्ण करणाऱ्या हुमरमळा वालावलच्या सरपंच अर्चना बंगे यांचे तहसीलदार अमोल पाठक यांनी अभिनंदन केले. माझ्याबरोबर माझे कर्मचारी तेवढेच कौतुकास पात्र असल्याचे सरपंच बंगे यांनी यावेळी सांगितले. पीएम किसान योजनेची केवायसी मुदतीत पूर्ण करावी, यासाठी महसूल यंत्रणा सतर्क राहून ग्रामपंचायत व तलाठी यांना कामाला लावून रात्रंदिवस यंत्रणा कार्यरत होती. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रत्येक तहसीलदारांना आदेश देऊन तलाठी व महसूल यंत्रणा कार्यान्वित केली. त्यात हुमरमळा-वालावल सरपंच बंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेविका, डाटा ऑपरेटर, तलाठी जाधव यांनी अहोरात्र मेहनत घेऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती केली. तसेच उपसरपंच स्नेहल सामंत यांनी आपल्या सेतू सुविधा केंद्रातही जलद व्यवस्था करुन शेतकऱ्यांची केवायसी व्यवस्था पूर्ण केली. तहसीलदार पाठक यांनी प्रत्येक ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयांना भेटी देत आढावा घेतला. हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीमध्ये भेटीदरम्यान गाव शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले.
---
बापर्डे ग्रामपंचायतीचा आदर्श
विजयदुर्ग ः पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करून बापर्डे ग्रामपंचायतीने एक वेगळा आदर्श ठेवला आहे. बहुतांश लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार होते; मात्र ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन लाभार्थ्यांची ई-केवायसी घरोघरी जाऊन पूर्ण केली. त्यामुळे बापर्डे ग्रामपंचायतीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तालुक्यातील पीएम किसान योजनेतील ६११२ लाभार्थ्यांनी पीएम किसान योजनेची ई-केवायसी केली नव्हती. यामुळे या योजनेचा अनुदानाचा १२ वा हप्ता मिळण्यापासून लाभार्थ्यांना वंचित राहावे लागणार होते. सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी पुढाकार घेतला. पीएम किसान योजनेपासून कोणतीही व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रचालक सचिन नाईकधुरे व ग्रामपंचायत कर्मचारी स्वप्निल तिर्लोटकर यांनी घरोघरी जाऊन ई-केवायसीची नोंद केली आहे.
---
४९६२४
वंदना पवार, युगा मुंज

भडगाव विद्यालयाचे यश
कुडाळ ः जूनमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत कुडाळ तालुक्यातील कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुकमधील वंदना पवार हिने ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गात जिल्ह्यात तृतीय, तर युगा मुंज हिने सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात २८ वा क्रमांक मिळविला. दोघांनाही प्रति महिना १००० प्रमाणे नववी ते बारावीपर्यंत एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असून त्यामुळे पुढील शिक्षणाला हातभार लागणार आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष चंद्रशेखर सावंत, संस्था सचिव संभाजी वळंजू, मुख्याध्यापक सचिन धुरी आदींचे अभिनंदन केले.
--
‘नवोदय’मध्ये निवड परीक्षा
सावंतवाडी ः सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात नववीतील रिक्त सहा जागा भरण्यासाठी निवड चाचणी प्रवेश प्रक्रिया ११ फेब्रुवारी २०२३ ला घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरावयाची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यता प्राप्त आठवी वर्गामध्ये शिकत असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसता येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राचार्य एम. के. जगदीश यांनी केले आहे. परीक्षा प्रवेशासाठी संबंधित विद्यार्थी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचे असून त्याचा जन्म १ मे २००८ ते ३० एप्रिल २०१० या कालावधीत झालेला असावा. परीक्षेसाठी अर्ज पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने भरण्यात यावेत. तसेच परीक्षा प्रवेश अर्ज व परीक्षेची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95334 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..