संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

दोडामार्गात सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरी ः चोवीस तासांत दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ८७.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ५६.९ मिलीमीटर पाऊस झाला. तर एकूण सरासरी २९२८.६ मिलीमीटर पाऊस झाला. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- १७.७ (२३४३.६), मालवण- ५४.५ (२६२६.८), सावंतवाडी- ७६.५ (३२७८.०), वेंगुर्ले- ५९.६ (२७५५.९), कणकवली- ६७.२ (३१३९.७), कुडाळ- ६१.३ (३१०१.८), वैभववाडी- ५४.९ (३४७०.४), दोडामार्ग- ८७.३ (३२६७.८).
............
पावसाचा वर्षा पर्यटनास फटका
ओटवणे ः शनिवारी सायंकाळपासून पावसाच्या संततधारेमुळे ओटवणे दशक्रोशीतून वाहणारी तेरेखोल नदी रविवारी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने रविवारी सर्वत्र पूरस्थिती होती. बांदा-दाणोली जिल्हा मार्गावरील सरमळे पूल शनिवारी रात्रीपासून पाण्याखाली होते. त्यामुळे या जिल्हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याचा फटका रविवारी वर्षा पर्यटनासाठी आंबोलीकडे जाणार्‍या पर्यटकांसह अन्य शेकडो वाहन चालकांना बसला. ओटवणे-देऊळवाडी तसेच सरमळे आमराई येथे वस्तीनजीक पुराचे पाणी आल्यामुळे तेथील रहिवाशांची भीतीने गाळण उडाली. माडखोल, धवडकी आणि फुगीवाडी येथेही नदी दुथडी भरून वाहत होती; मात्र नदीने धोक्याची पातळी न ओलांडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
--------------
शेवरेवाडी रस्ता
वाहतुकीस अयोग्य
मालवण, ता. १२ ः कुंभारमाठ ते चिपी विमानतळ या मार्गावर वरची देवली शेवरेवाडी येथे रस्त्यात मोठी झाडे कोसळून रस्ता वाहतुकीस अयोग्य बनला आहे. या रस्त्यावरून दुचाकी वाहने सोडली, तर चारचाकी किंवा अवजड वाहनांची वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. रस्त्याच्या बाजूला विद्युत खांब आणि विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. रस्ता मोकळा करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
-------------------
बंद एसटीमुळे
नाटळात गैरसोय
कणकवली, ता. १२ ः येथील बसस्थानकातून सुटणारी नाटळ-थोरले मोहूळ बसफेरी गणेश चतुर्थीपासून बंद आहे. परिणामी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सुमारे चार किलोमीटर अंतर पायपीट करत काळोखातून वन्यप्राण्यांचा धोका पत्करून विद्यार्थी व ग्रामस्थांना अन्य बस किंवा खासगी वाहनांने प्रवास करण्यासाठी यावे लागत आहे. बंद असलेली ही बसफेरी त्वरित सुरु करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपसरपंच दत्ताराम खरात यांनी दिला आहे. गणेशोत्सवात चाकरमानी आणि प्रवाशांना गावोगावी जाण्यासाठी सुरु केल्या; मात्र गणेश चतुर्थीपासून नाटळ थोरले मोहूळ बसफेरी बंद असून त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय होत आहे.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95336 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..