रत्नागिरी-अडथळा ठरणारे लाकडी खांब हटवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-अडथळा ठरणारे लाकडी खांब हटवले
रत्नागिरी-अडथळा ठरणारे लाकडी खांब हटवले

रत्नागिरी-अडथळा ठरणारे लाकडी खांब हटवले

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat१२p१६.JPG-KOP२२L४९६४२ गणपतीपुळे ः येथील स्वागत कमानीसमोरील सर्व लाकडे बाजूला केल्यामुळे मार्ग स्वच्छ झाला आहे.
---------------

अडथळा ठरणारे लाकडी खांब हटवले
श्रीक्षेत्र गणपतीपुळे ; अंगारकीसाठी भाविकांना दिलासा
रत्नागिरी, ता. १२ ः तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मुख्य आपटातिठा मार्गावरील अर्धवट अवस्थेत असलेल्या स्वागत कमानीच्या कामाचे लाकडी खांब रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आले होते. अंगारकीनिमित्त मंगळवारी (ता. १३) गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ते खांब तत्काळ हटवण्यात आले आहेत.
तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेत मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी हजेरी लावणार आहेत. त्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत नियोजन करत आहेत. गणपतीपुळे मंदिराकडे जाणार्‍या मुख्य आपटातिठा मार्गावरील सध्या अर्धवट अवस्थेत असलेल्या स्वागत कमानीच्या कामाचे लाकडी खांब ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते ते लाकडी खांब तत्काळ हटवण्याचे मुख्य काम गणपतीपुळे ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा गणपतीपुळे देवस्थानचे मुख्य पुजारी अमित घनवटकर आणि पंचायत समितीचे माजी सदस्य गजानन उर्फ आबा पाटील, गणपतीपुळेत शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे यांच्या विशेष प्रयत्नाने हटवण्यात आले आहेत. श्रीक्षेत्र गणपतीपुळेतील आपटातिठा मार्गावर सध्या स्वागत कमान करण्याचे काम सुरू असल्यामुळे येणार्‍या भाविक व पर्यटकांची वाहने कमानीच्या बाहेरील पर्यायी मार्गाने ये-जा करत करतात. तसेच इतर सर्वच वाहनांसाठी हा पर्यायी मार्ग केलेला असताना अंगारकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेता दोन्ही मार्गांनी वाहतूक सुरळीत चालू राहता यावी आणि वाहतुकीला कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95356 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..