साडवली-टुडे पान 1 साठी संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-टुडे पान 1 साठी संक्षिप्त
साडवली-टुडे पान 1 साठी संक्षिप्त

साडवली-टुडे पान 1 साठी संक्षिप्त

sakal_logo
By

गणेश वेदपाठशाळेत
आज अथर्वशीर्षाची आवर्तने
साडवली ः वेद अध्ययन करून वेद संस्कृती जोपासण्याचे कार्य देवरूख येथील श्री गणेश वेदपाठशाळा करत आहे. ही संस्था यंदा आपले रौप्यमहोत्सवी वर्ष विविध उपक्रम राबवून साजरा करत आहे. याचाच एक भाग म्हणून १३ सप्टेंबरला अंगारकीनिमित्त गणेश अथर्वशीर्षाची आवर्तने होणार आहेत. संध्याकाळी ६.३० ते ८.३० अशी वेळ असणार आहे. नंतर महाप्रसाद होणार आहे. यासाठी देवरूख परिसर, साडवली, काटवली, हरपुडे येथील नागरिक सोवळे, धोतर अशा पारंपरिक वेषात सहभागी होणार आहेत. यासाठी नावनोंदणी सुरू आहे. मधळी आळीसाठी चिन्मय साने, अमित साने, वरची आळीसाठी मिलिंद जुवेकर, खालची आळी व कांजिवरासाठी संजय भागवत, प्रशांत राजवाडे आणि केशवसृष्टीसाठी रवींद्र साठे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
-----------
अंध व्यक्तींसाठी कर्करोग निदान शिबीर
राजापूर ः ब्लाईंड पर्सन्स असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २४ सप्टेंबरला सकाळी १० ते ३ या वेळेत संस्थेच्या मुंबई येथील रे रोड (पूर्व) येथील कार्यालयात अंध व्यक्तींसाठी विनामूल्य कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर इंडीयन कॅन्सर सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सहभागी होवू इच्छिणार्‍या लाभार्थ्यांनी आपली नावे १७ सप्टेंबरपर्यंत संस्थेकडे नोंदणी करावयाची आहेत. त्याच दिवशी या ठिकाणी संस्थेच्यावतीने ८५ अंध पालकांच्या ११११ मुलांसाठी शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वितरण केले जाणार आहे. १ ऑक्टोबरला सायंकाळी ५ ते ८ वा. दरम्यान अंध बंधू भगिनींसाठी गरब्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच इतर विविध स्पर्धासुद्धा ऑनलाइन आभासी माध्यमाद्वारे आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे मानद संयुक्त सचिव मनोहर जड्यार यांनी केले आहे.
---------

‘तेजस’ नोव्हेंबरपासून
मडगावपर्यंत धावणार
रत्नागिरी ः कोकण रेल्वेमार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस १ नोव्हेंबरपासून करमाळीऐवजी मडगावपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. मुंबईतील सीएसएमटी ते करमाळी अशी धावणारी तेजस एक्स्प्रेस गोव्यातील करमाळीऐवजी मडगावपर्यंत नेण्याची मागणी या आधीपासून करण्यात येत होते. अखेर या मागणीला यश आले असून आता ही गाडी १ नोव्हेंबरपासून मडगावपर्यंत विस्तारित केली जाणार आहे. ही गाडी सीएसटी स्थानकातून पहाटे ५.५० वाजता सुटून दुपारी २.४० मिनिटांनी मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मडगावहून दुपारी ३.१५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ती ११.५५ वाजता सीएसटी टर्मिनसला पोहचेल. कोकण रेल्वेच्या गाड्या ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार चालवल्या जातात. हे वेळापत्रक संपून नियमित वेळापत्रकाच्या पहिल्या दिवसापासून १ नोव्हेंबरपासून हा बदल केला जाणार आहे. तोपर्यंत तेजस एक्स्प्रेस करमाळीपर्यंतच धावणार आहे.
--------
माजी विद्यार्थी संघाकडून महाप्रसाद वाटप
रत्नागिरी ः भांडूपमधील महाराष्ट्रीय शिक्षणसंस्था संचलित पराग विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे अनंत चतुर्थीला छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे गणेश विर्सजनाला आलेल्या गणेशभक्तांच्या सोईसाठी पिण्याचे पाणी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी श्री गणरायाचा प्रसाद म्हणून चणे, शिरा बुंदी लाडू, पाणी, लहान मुलांसाठी बिस्किट आदींचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी तलाव परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली होती. सुमारे पाच ते सहा हजार गणेशभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95357 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..