राजापूर ः बेशिस्त दुचाकी पार्किंगवरही कारवाई हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः बेशिस्त दुचाकी पार्किंगवरही कारवाई हवी
राजापूर ः बेशिस्त दुचाकी पार्किंगवरही कारवाई हवी

राजापूर ः बेशिस्त दुचाकी पार्किंगवरही कारवाई हवी

sakal_logo
By

बेशिस्त दुचाकी पार्किंगवरही कारवाई हवी
राजापूर पालिका ; अतिक्रमणविरोधी कारवाईचे स्वागत
राजापूर, ता. १२ः शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणांच्या विरोधात मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईचे सर्वसामान्यांमधून स्वागत केले जात आहे. त्याचवेळी आता बाजारपेठेतील या रस्त्यावर दिवसभर पार्किंग करून ठेवलेली आणि या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या दुचाकींवरही योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेले होते. रस्त्यावरील हे अतिक्रमण वाहतुकीला अडथळे ठरत होते. संबंधितांनी स्वतःहून हे अतिक्रमण हटवावे, अशी सूचना पालिकेकडून वारंवार करण्यात आली होती. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. या कारवाईमुळे बाजारपेठेतील रस्त्याने काहीसा मोकळा श्‍वास घेतला आहे. या कारवाईनंतर या रस्त्याच्या दुतर्फा दिवसभर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून केली जात आहे.

अरुंद रस्त्यावर पार्कींग
बाजारपेठेतील या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी वाहने पार्किंग केलेली असतात. या वाहनांमुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. बाजारपेठेतील हा मुख्य रस्ता आधीच अरूंद असल्याने वाहतूक कोंडी होती. त्यामध्ये पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांची भर पडून वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे बाजारपेठेतील या रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगवरही योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95359 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..