राजापूर-दमदार पावसाने भातशेतीला संजीवनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-दमदार पावसाने भातशेतीला संजीवनी
राजापूर-दमदार पावसाने भातशेतीला संजीवनी

राजापूर-दमदार पावसाने भातशेतीला संजीवनी

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat12p10.jpg ः KOP22L49621 राजापूर ः लोंब्या तयार झालेली भातशेती.


दमदार पावसाने भातशेतीला संजीवनी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यामध्ये दमदारपणे पाऊस पडत असून त्याचा भातशेतीला दिलासा मिळाला आहे. सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे उशीरा लावणी झालेली भातशेती चांगलीच तरारली आहे. वेळेमध्ये लावणी झालेली भातशेती पसवली असून काही भागामध्ये भाताच्या लोंब्या तयार झाल्या आहेत. काही भागातील भातशेती पसवण्याला सुरवात झाली आहे.
कधी दडी तर कधी मुसळधार, असा कायमच लपंडाव खेळणाऱ्या पावसाने यावर्षी सातत्य राखले होते. भातशेतीच्या लावणीच्या हंगामाच्या सुरवातीला पावसाने सातत्य राखले असले तरी त्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये नेहमीप्रमाणे दडी मारल्याने लावणीची कामे रखडली होती. त्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये शेतकर्‍यांना भातशेतीच्या लावणीसाठी पाणी पाणी करावे लागले होते. तालुक्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांची श्रावण महिन्यापर्यंत उशिरापर्यंत लांबणीवर पडली होती. शेतकऱ्यांनी पंपाच्या साह्याने जादा खर्चाचा भार उचलत लावणीची कामे उरकली. मात्र भातशेतीच्या लावणीच्या हंगामातील या फरकाचा भातशेती पसवण्यावर परिणाम झाल्याचा दिसून येत आहे.
ज्या भागामध्ये लावणी वेळेमध्ये झाली त्या भागातील भातशेती पसवली असून भाताच्या लोंब्याही चांगल्याप्रकारे झाल्या आहेत. काही दिवसांमध्ये लोंब्यामधील भाताचे दाणे चांगल्याप्रकारे तयार होणार आहेत. त्यामुळे शेतकरी राजा कमालीचा सुखावला आहे. एका बाजूला एका भागातील शेतकरी खुश असताना दुसऱ्या बाजूला ज्या भातशेतीची लावणी उशिरा झाली त्या भागातील भातशेती फुलोऱ्यामध्ये येत आहे. त्यामुळे या फुलोर्‍याचे लोंब्यामध्ये रूपांतर होऊन त्याचे कापणीयोग्य भातामध्ये कधी रूपांतर होणार, असा प्रश्‍न काही शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. भातशेतीला पाण्याची गरज असताना गेल्या काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसाच्या दिवसभर मोठ्या सातत्याने सरी पडत नसल्या तरी दिवसातून चार-पाचवेळा पडणाऱ्या पावसाच्या सरीही भातशेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे ज्या भागातील भातशेती फुलोर्‍यामध्ये आहे त्या भागातील शेतकरी खुश झाला आहे. मात्र, त्याचवेळी पावसाचे पुनरागमन लोंब्यामध्ये असलेली भातशेतीसाठी धोकादायक असल्याने त्या शेतकर्‍यांमध्ये पावसाच्या पुनरागमनाबाबत काहीसा गम असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95360 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..