तुळसच्या साटम कुटुंबियांना जिल्हा बँकेतर्फे विम्याचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळसच्या साटम कुटुंबियांना 
जिल्हा बँकेतर्फे विम्याचा लाभ
तुळसच्या साटम कुटुंबियांना जिल्हा बँकेतर्फे विम्याचा लाभ

तुळसच्या साटम कुटुंबियांना जिल्हा बँकेतर्फे विम्याचा लाभ

sakal_logo
By

49644
तुळस ः ममता साटम यांना पत्र देताना मनीष दळवी, सुनील जाधव व कर्मचारी.

तुळसच्या साटम कुटुंबियांना
जिल्हा बँकेतर्फे विम्याचा लाभ
वेंगुर्ले ः प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्हा बँकेच्या होडावडा शाखेत तुळस येथील ममता साटम यांच्या खात्यात २ लाख रुपये जमा केले. याबाबतचे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याहस्ते साटम यांना देण्यात आले. तुळस-पांडेपरबवाडी येथील महेश वसंत साटम यांचे ९ जून २०२१ ला अपघाती निधन झाले. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या होडावडा शाखेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा उतरवला होता. त्यांच्या मृत्यूनंतर वारस म्हणून त्यांची पत्नी ममता यांना विम्याचे २ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. दरम्यान, यावेळी होडावडा शाखा व्यवस्थापक सुनील जाधव, बँक कर्मचारी आर्ची कांबळी, राघवी डिचोलकर, प्रीतम ठाकूर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95365 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..