चिपळूण-संत गोरा कुंभार पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-संत गोरा कुंभार पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव
चिपळूण-संत गोरा कुंभार पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव

चिपळूण-संत गोरा कुंभार पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव

sakal_logo
By

फोटो ओळी-- २ कॉलम
-rat12p19.jpg- ः चिपळूण ः समाजातील मान्यवरांचा गौरव करताना कुंभार समाजाचे पदाधिकारी.
----------------

संत गोरा कुंभार पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव
वीजबिल भरणा केंद्रही सुरू ; सभागृहाचेही उदघाटन
चिपळूण, ता. १२ ः कुंभार समाजाच्या खेर्डी येथील संत गोरा कुंभार नागरी सहपतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पतसंस्था चेअरमन सुभाष गुडेकर, कुंभार समाजाचे प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर, कार्याध्यक्ष महेश सायकर, ज्येष्ठ नेते कुंभार गुरूजी, तालुकाध्यक्ष प्रकाश साळवी यांच्या उपस्थितीत पतसंस्थेच्या नवीन सभागृहाचे उद्घाटन झाले. मुरादपूर येथील जयंत शिरकर यांना समाजगौरव, विलास पडवेकर व अरविंद पडेवकर यांना समाजसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले. कीर्तनकार व निरुपणकार म्हणून सखाराम साळवी, सुधाकर निवळकर, शशिकांत पिरदनकर, सांस्कृतिक कार्याबद्दल वसंत गुडेकर, विजय बागावडे, बजरंग कुंभार, बारावा विधी/उत्तरकार्यासाठी सेवा देणारे राजाराम शिरकर, अनंत साळवी, प्रभाकर पडवेकर, अशोक साळवी यांचा गौरव केला. दहावी, बारावी, पदवी व पदविकाप्राप्त एकूण 60 विद्यार्थ्यांचा प्रशस्तीप्रत्रक व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. संत गोरा कुंभार विकास मंडळाने सभागृहाची वास्तू स्वमालकीने उभी केली. पतसंस्थाही स्वमालकीच्या इमारतीत आहे. पतसंस्थेनेही कात टाकली असून कुंभार समाजबरोबरच इतर समाजातील गरजूंनाही कर्जपुरवठा सुरू केला आहे. समाजाच्या प्रगतीसाठी जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, सचिव प्रकाशशेठ साळवी नियमीतपणे योगदान देत असल्याने आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
पतसंस्थेच वीजबिल भरणा केंद्र सुरू केले असून त्याचेही उदघाटन करण्यात आले. या वेळी प्रकाश महाराज निवळकर, अनंत पालकर, नाना पालकर, प्रमोद साळवी, गजानन पालकर, अरविंद गुडेकर, सुनील टेरवकर, रवींद्र शिरकर, सुनील टेररवकर, अण्णा गुडकर, रूक्मिणी कुंभार, ऋतूजा शिरकर व समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95369 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..