मळगाव धबधब्याच्या ग्रीलचे कंटेनरच्या धडकेने नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगाव धबधब्याच्या ग्रीलचे 
कंटेनरच्या धडकेने नुकसान
मळगाव धबधब्याच्या ग्रीलचे कंटेनरच्या धडकेने नुकसान

मळगाव धबधब्याच्या ग्रीलचे कंटेनरच्या धडकेने नुकसान

sakal_logo
By

49659
मळगाव ः येथील धबधब्याजवळचे तुटलेले लोखंडी ग्रील.

मळगाव धबधब्याच्या ग्रीलचे
कंटेनरच्या धडकेने नुकसान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनरची मळगाव येथील धबधब्या समोर उभारण्यात आलेला लोखंडी ग्रीलला धडक बसली. यात लोखंडी ग्रीलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, अपघातानंतर त्या कंटेनर चालकाने पळ काढला.
याबाबत अधिक माहिती अशी की, या अपघातात सुमारे १ लाखाचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून धबधबे सुशोभीकरण करण्यासाठी प्राप्त झालेल्या निधीतून या धबधब्याच्या समोर चार वर्षांपूर्वी हे लोखंडी ग्रील उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी उभे राहून प्रवाशांना व पर्यटकांना धबधब्याचा आनंद लुटता यावा, अपघात होऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. शुक्रवारी रात्री घाटातून गॅस घेऊन जाणाऱ्या एका मोठ्या कंटेनरचा मागील भाग त्या ग्रीलला लागल्यामुळे मोठे नुकसान झाले. याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही. याबाबत वनविभागाचे अधिकारी मदन क्षिरसागर म्हणाले, ‘‘कंटेनरच्या धडकेत काल रात्री हा अपघात घडला आहे. अपघातानंतर संबंधित कंटेनर चालकानी तेथून पळ काढला आहे. घटनाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. संबंधित कंटेनर चालकाचा शोध घेऊन त्याच्याकडून झालेले नुकसान वसूल करण्यात येणार आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95375 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..