परफेक्ट ॲकॅडमीचे ‘नीट’ परीक्षेमध्ये यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परफेक्ट ॲकॅडमीचे
‘नीट’ परीक्षेमध्ये यश
परफेक्ट ॲकॅडमीचे ‘नीट’ परीक्षेमध्ये यश

परफेक्ट ॲकॅडमीचे ‘नीट’ परीक्षेमध्ये यश

sakal_logo
By

49673
कुडाळ ः नीट परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आमदार वैभव नाईक. सोबत प्रा. राजाराम परब. (छायाचित्र ः अजय सावंत)

परफेक्ट ॲकॅडमीचे
‘नीट’ परीक्षेमध्ये यश

कुडाळ, ता. १२ ः नीट या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालामध्ये परफेक्ट ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. दीक्षा तोंडवळकर हिला ५७४ तर भक्ती पाटील हिला ५३१ तर सातारा जिल्ह्यातून खास नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या रविराज रजागे याला ५२५ गुण मिळाले. ॲकॅडमीतर्फे आयोजित या कार्यक्रमांमध्ये, नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नाईक यांनी विद्यार्थी तसेच पालक आणि विशेषतः ॲकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा. राजाराम परब यांचे विशेष कौतुक केले. आमदार नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रवेश परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षा यामध्ये त्यामानाने मागासलेला जिल्हा होता; पण गेल्या काही वर्षांमध्ये परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील विद्यार्थी इथेच राहून घवघवीत यश मिळवत आहेत. पुढच्या वर्षी याहीपेक्षा उज्वल निकाल देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि पूर्ण देशाचे भविष्य आहात या जबाबदारीने अभ्यास करा, असे आवाहन देखील केले. या कार्यक्रमाप्रसंगी परफेक्ट ॲकॅडमीचे चेअरमन प्राध्यापक परब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू राऊळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. आर. परब उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95393 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..