रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

नीटमध्ये कौशिक रेडीज, निरंजन हाकेचे यश
रत्नागिरी ः एनटीएमार्फत यावर्षी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत केळकर कनिष्ठ महाविद्यालयातील कौशिक रेडीजने ६७० मार्कांसह १६१३ ऑल इंडिया रँक तसेच ४४० कॅटेगरी रँक असे विशेष यश संपादन केले. निरंजन हाकेने नीट परीक्षेत ६२५ मार्कसह ११००४ ऑल इंडिया रँक तसेच ४२७७ कॅटेगरी रँकसह उत्कृष्ट यश संपादन केले. व्हीआयटी वेल्लोर प्रवेशपरीक्षेत अंश गांधीने २९४६ रँकसह कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश मिळवून तो व्हीआयटी वेल्लोर येथे पुढील शिक्षणासाठी रवानाही झाला आहे.


चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे
जीजीपीएसला देणगी
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गं. गो. पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेला (जीजीपीएस) शैक्षणिक सोयीसुविधांकरिता अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांच्यासह अविनाश काळे, वसतीगृहाचे व्यवस्थापक रविकांत शहाणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला. याप्रसंगी शैक्षणिक क्रीडाशिक्षक श्री. कदम उपस्थित होते. जीजीपीएस शाळेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे. शाळेच्या देदिप्यमान यशाबद्दल शैक्षणिक उठाव म्हणून विद्यार्थ्यांना उपयोगी पडणाऱ्या साधनांसाठी किंवा गरजेच्या गोष्टीसाठी हा निधी खर्च करता येणार आहे.
---------

जैतापूर गाडी हातिवलेमार्गे सोडा
राजापूर ः जैतापूरहून सकाळी साडेसहा वाजता राजापूरला जाणारी एसटी पडवे-विलये-डोंगर मार्गे जात आहे. त्यामुळे या गाडीतून डोंगरतिठा, हातीवले येथील मराठे कॉलेजसह अन्य भागामध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित गाडी पूर्वीप्रमाणे डोंगर तिठा हातिवलेमार्गे सोडण्यात यावी, अशी मागणी जैतापूर ग्रामपंचायतीने आगार प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जैतापूरचे सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविरकर यांनी वाहतूक निरीक्षक श्री. मोरे यांच्याकडे सुपूर्द केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95410 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..