विजेचा धक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेचा धक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
विजेचा धक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

विजेचा धक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

sakal_logo
By

49710
शहीदरजा

विजेचा धक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

उंबर्डेतील घटना; बटण सुरू करताना घटना

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १२ ः विजेचा धक्का बसुन गंभीर जखमी झालेल्या उंबर्डे-मेहबुबनगर येथील शहीदरजा नियाज फरास (वय १४) या नववीतील विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. हा प्रकार काल (ता.११) आठ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे उंबर्डे मेहबुबनगरवर शोककळा पसरली आहे.
उंबर्डे-मेहबुबनगर येथे शहीदराजचे घर आहे. तो कोळपे-उंबर्डे उर्दू हायस्कुलमध्ये नववीत शिकत होता. काल सायंकाळी नमाज पठण झाल्यानंतर तो घरी आला. तेथून वाडीतच असलेल्या मामाच्या घरी गेला. रात्री आठच्या सुमारास तो घरी परतला. घरातील लोखंडी जिन्यावरून तो लाईटचे बटण सुरू करीत होता. याचवेळी त्याला विजेचा जोरदार झटका बसला. त्याने तो जिन्यावरून खाली कोसळला. गंभीर जखमी शहीदरजाला तातडीने उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले; परंतु डॉक्टरांनी त्याला वैभववाडीत नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. येथे प्राथमिक उपचार करून कणकवलीतील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना रात्री दहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे फरास कुटुंबिय कोलमडुन गेले. ही माहिती उंबर्डेत समजताच मेहबुबनगरवर शोककळा पसरली. शहीदराज हा मनमिळावू होता. नववीत शिकत असला तरी त्याचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95447 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..