रत्नागिरी-अस्तित्व लपवणाऱ्या आरोपीला सात दिवसांचा कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-अस्तित्व लपवणाऱ्या आरोपीला सात दिवसांचा कारावास
रत्नागिरी-अस्तित्व लपवणाऱ्या आरोपीला सात दिवसांचा कारावास

रत्नागिरी-अस्तित्व लपवणाऱ्या आरोपीला सात दिवसांचा कारावास

sakal_logo
By

संशयितरित्या फिरणाऱ्या तरुणास शिक्षा
रत्नागिरी, ता. १२ ः कुवारबाव येथे संशयितरित्या फिरणाऱ्या संशयितास न्यायालयाने सात दिवसांचा साधा कारावास व दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. जनार्दन रमेश गावीत (वय १९, रा. आंबोडे, ता. सुर्गाना, जि. नाशिक) असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांना निदर्शनास आली होती. आरोपी गावीत हा कुवारबाव बाजारेपठ येथील सुप्रिया किराणा जनरल स्टोअर्स येथे दुकानाच्या आडोशाला पडवेवाडी ते मिरजोळे जाणाऱ्या रस्त्यावर लपवलेल्या स्थितीत सापडला. त्यांच्याकडे एक स्क्रु ड्रायव्हर, हेक्सॉ ब्लेड असे घरफोडीचे सामान होते. त्याच्याकडे ७७० रुपयांची रोख रक्कम होती. पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी (ता ८) या खटल्याचा निकाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वणकोरे यांच्यासमोर झाला. न्यायालयाने संशयिताला सात दिवसांचा साधा कारावास व दोनशे रुपयांचा दंड ठोठावला. सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी तर मदतनीस म्हणून दुर्वास सावंत यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95457 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..