रत्नागिरी-जिल्ह्यात पावसाचा जोर कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
रत्नागिरी-जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

रत्नागिरी-जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

sakal_logo
By

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
मासेमारीला अजुनही ब्रेक ; लांज्यात सर्वाधिक पाऊस
रत्नागिरी, ता. १२ ः हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून जिल्ह्यात गेले चार दिवस जोरदार पाऊस सुुरु आहे. त्याचा फायदा भातशेतीला झाला आहे; मात्र खोल समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती असल्याने मासेमारीला अजुनही ब्रेक लागला आहे.
जिल्ह्यात सोमवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी ३१.६७ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड २, दापोली २३, खेड ४, गुहागर ४०, चिपळूण २९, संगमेश्‍वर २५, रत्नागिरी ३५, लांजा ७९, राजापूर ४८ मिमी पाऊस झाला. चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी या तिन तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. मंगडणगड, खेड तालुक्यात अधुनमधून सरी पडत आहेत. रत्नागिरी तालुक्यात रविवारी सायंकाळपासून पावसाला आरंभ झाला. रात्रभर पडणार्‍या पावसामुळे नद्या, नाले भरुन वाहत आहेत. सोमवारी दिवसभर सरी कोसळत होत्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालेला होता. शहरात ठिकठिकाणी पाणी साचून राहीले होते. पाण्याची गरज असताना पडलेल्या पावसामुळे भातशेती पुन्हा तरारली आहे. ज्या भागातील भातशेती फुलोर्‍यामध्ये आली आहे, त्यांना हा पाऊस फायदेशीर ठरलेला आहे. पावसाबरोबरच किनारी भागात वारेही वाहत आहेत. खोल समुद्रात अजुनही वादळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे मच्छीमारांनी नौका बंदरातच उभ्या करून ठेवणे पसंत केले आहे. पर्ससिननेटसह काही ट्रॉलिंगवाले धोका पत्करुन समुद्रात जात आहेत. त्यांनाही पाहिजे तसा रिपोर्ट मिळत नसल्याने माघारी परतावे लागत आहेत. वादळ थंडावण्याची प्रतीक्षा मच्छीमार करत आहेत. प्रशासनाकडूनही मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95468 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..