गव्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ परराज्यातील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गव्याचा ‘तो’ व्हायरल 
व्हिडिओ परराज्यातील
गव्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ परराज्यातील

गव्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ परराज्यातील

sakal_logo
By

गव्याचा ‘तो’ व्हायरल
व्हिडिओ परराज्यातील

क्षीरसागर ः विश्वास ठेवू नका

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः गव्याने एका रिक्षेला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ असनिये (ता. सावंतवाडी) येथील तर कोणी राधानगरी फोंडा येथील असल्याचे सांगत आहेत. पण, जेव्हा या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता तसेच वनविभागाशी संपर्क साधला असता तो कर्नाटक किंवा केरळ येथील असल्याचे स्पष्टीकरण वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिले. या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
गेल्या काही दिवसापासून गव्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. गव्यांनी मध्यंतरी आंबोली-आजरा मार्गावर कारला धडक दिली तर माजगाव-सावंतवाडी मार्गावर कारला दिलेल्या धडकेत अनेकजण जखमीही झाले होते. या सर्व घटना ताज्या असतानाच अचानक गव्याने एका रिक्षेला धडक दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सर्वचजण अवाक झाले. हा व्हिडिओ जिल्ह्यातील असावा असेच सर्वाना वाटू लागले. त्यानंतर प्रत्येकजण हा व्हिडिओ प्रत्येक गावाचे नाव जोडून व्हायरल करू लागले. अनेकांनी तर हा व्हिडिओ असनिये येथील असल्याचे सांगत व्हायरल केला. मात्र, याबाबत सावंतवाडी वनक्षेत्रपाल क्षीरसागर यांना विचारले असता त्यांनी हा व्हिडीओ असनिये भागातील नसून अशी कोणतीही घटना तेथे घडल्याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही, असे सागितले. हा व्हिडिओ केरळ किंवा तामिळनाडू, कर्नाटक येथील आहे; पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95475 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..