छोटा हत्ती टेम्पोमधून तार चोरल्याचे उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छोटा हत्ती टेम्पोमधून
तार चोरल्याचे उघड
छोटा हत्ती टेम्पोमधून तार चोरल्याचे उघड

छोटा हत्ती टेम्पोमधून तार चोरल्याचे उघड

sakal_logo
By

छोटा हत्ती टेम्पोमधून
तार चोरल्याचे उघड

सावंतवाडीचे प्रकरण सीसीटीव्हीत कैद

सावंतवाडी, ता. १२ ः सालईवाडा येथील इलेक्ट्रिक ठेकेदार प्रसाद नार्वेकर यांच्या गोडाऊनमधील तारेची बंडले चोरी प्रकरणात छोटा हत्ती टेम्पोचा वापर केल्याचे पोलिसांनी सांगितले. तशा प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून लवकरच चोरट्यांना जेरबंद करू, असा विश्वास पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी व्यक्त केला आहे.
सालईवाडा येथील इलेक्ट्रिक ठेकेदार नार्वेकर यांच्या गोडाऊनमध्ये ठेवलेली तारेची बंडले अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. शनिवारी रात्री सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत होता. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली होती. शहरातील सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. त्यात शनिवारी साडेतीनच्या सुमारास दोन छोटा हत्ती टेम्पो शहरात दिसून येत आहेत. टप बांधलेला एक टेम्पो शहरातील गांधी चौकातून उभाबाजार परिसरात गेल्याचे दिसून आले. त्यामुळे या चोरी प्रकरणात टेम्पोचा वापर केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे; मात्र काही सीसीटीव्ही बंद असल्यामुळे तपासकामात अडचणी येत आहेत. शिवाय पाऊस असल्याने फुटेज स्पष्ट दिसत नाही. तरीही संबंधित चोरट्यांपर्यंत पोचू, असा विश्वास पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95503 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..