शेळीपालनातून आर्थिक सक्षम व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेळीपालनातून आर्थिक सक्षम व्हावे
शेळीपालनातून आर्थिक सक्षम व्हावे

शेळीपालनातून आर्थिक सक्षम व्हावे

sakal_logo
By

kan132.jpg
49774
फोंडाघाटः येथील महाविद्यालयात शेळीपालन प्रशिक्षणाला मार्गदर्शन करताना भास्कर काजरेकर.
------
शेळीपालनातून आर्थिक सक्षम व्हावे
भास्कर काजरेकरः फोंडाघाट महाविद्यालयात शेळीपालन प्रशिक्षण
फोंडाघाट, ता. १३ः शेतकऱ्यांनी शेळीपालनातून आर्थिक सक्षम बनावे. शेती हा ग्रामीण भागाचा कणा आहे. या सोबत शेतीपुरक व्यवसायात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहीजे, असे मत किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख भास्कर काजरेकर यांनी व्यक्त केले. येथील शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
फोंडाघाट महाविद्यालयात शेळीपालन प्रशिक्षणाचा प्रारंभ फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाष सावंत यांच्या हस्ते झाला. प्राचार्य डॉ. विष्णु फुलझेले, प्रदिप सावंत-पटेल, राजेंद्र सावंत, शांताराम रावराणे, राजू रावराणे, पिंटू पटेल, प्रशिक्षक डॉ. केशव देसाई, माधवी दळवी, तृप्ती सावंत आदी उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्रामार्फत "समृद्ध व आनंदी गाव" संकल्पनेतून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देऊन आर्थिक सक्षम बनविण्यासाठी विविध उपक्रमांची व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. विविध शेतीपूरक व्यवसाय अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने सुरू करण्याकरता आम्ही मदत व मार्गदर्शन करत असतो. प्रशिक्षणानंतर ही ज्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तसेच तांत्रिक मदतीची गरज असेल अशा प्रशिक्षणार्थींना ते दिले जाईल. या प्रशिक्षणादरम्यान विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात येणार आहे असे श्री. काजरेकर यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. फुलझेले म्हणाले की, ग्रामीण भागात बकरी म्हणून प्रसिद्ध असलेली शेळी उपजिविकेचे महत्त्वाचे साधन आहे. गाई म्हशी पालन व्यवसायांच्या तुलनेत शेळीपालन व्यवस्थापनाचा खर्च कमी येतो. शेळीपालन व्यवसायात खूप मोठी श्रीमंती असून याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणार्थींनी आपला व ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधावा.
प्रदीप सावंत- पटेल म्हणाले की, फोंडाघाट परिसरात आजपर्यंत आपण अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून यापुढेही ते राबविण्याचा आपला मानस आहे. कोणत्याही व्यवसायासाठी अर्थ साहाय्य देणारे वित्तीय संस्था प्रशिक्षण प्रमाणपत्राची मागणी करतात तेव्हा सर्व प्रशिक्षणार्थीनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून वित्तीय साहाय्य मिळवावे व आपली आर्थिक प्रगती साधावी. सुत्रसंचालन डॉ. केशव देसाई यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. डॉ. बालाजी सूरवसे यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95585 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..