राखेतून उडाला मोर संहितेचे पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राखेतून उडाला मोर संहितेचे पूजन
राखेतून उडाला मोर संहितेचे पूजन

राखेतून उडाला मोर संहितेचे पूजन

sakal_logo
By

rat13p6.jpg
L49785
रत्नागिरीः येथील मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या बालनाट्य स्पर्धेसाठीच्या संहिता पूजनाच्यावेळी मार्गदर्शन करताना ‘सकाळ’ जाहीरात प्रतिनिधी दत्तप्रसन्न कुलकर्णी.
....................

देसाई प्रशालेत राखेतून
उडाला मोर संहितेचे पूजन
रत्नागिरी, ता. १४ः प्रत्येक मुलामध्ये काहीना काही सुप्त गुण दडलेले असतात. या बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून आपली प्रशाला या सुप्त गुणांना प्रकट करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या प्रशालेचा आजवरचा सांस्कृतिक प्रवास पाहता या नाटकासाठी निवड झालेले विद्यार्थी मिळालेल्या संधीचे सोने करतील व उत्तम यश संपादन करतील, असा विश्‍वास ‘सकाळ’चे जाहीरात प्रतिनिधी दत्तप्रसन्न कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
शहरातील माळनाका मराठा मंदिर या संस्थेच्या अ. के. देसाई हायस्कूल येथे डॉ. सतीश साळुंके लिखित ''राखेतून उडाला मोर'' या बालनाट्य संहिता पूजनाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी मुख्याध्यापक प्रमोद शेखर, संतोष गार्डी, मिनाल नाखरेकर, जयसिंग लोहार, विनोद गावखडकर, अंजली पिलणकर, वृषाली सावंत, श्रद्धा नागवेकर, दत्ताराम घडशी, कमलाकर परब, निखील भुते, प्रवीण धुमक आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95606 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..