माडखोल फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माडखोल फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश
माडखोल फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश

माडखोल फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

swt135.jpg
49807
शुभम पाटील, नम्रता नवले, अनिकेत मेळावणे

माडखोल फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश
ओटवणेः शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माडखोल येथील व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसीचा निकाल 99 टक्के लागला. महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष आठव्या सत्राचा निकाल जाहीर झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे - रायगडशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयातून शुभम पाटील, नम्रता नवले व अनिकेत मेळावणे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार डॉ. राहूल पाटील तसेच महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
.............
भरतगड हायस्कूलतर्फे झेंडू लागवड
मालवणः मसुरे-देऊळवाडा येथील भरतगड हायस्कूल नं. २ चे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शाळा समिती अध्यक्ष व ग्रामस्थांच्या श्रमदानाने व लोकवर्गणीतून शाळा परिसरात पाच गुंठे जागेत पाचशेपेक्षा जास्त झेंडूची लागवड करून स्तुत्य उपक्रम राबविला होता. या फुलांच्या उत्पन्नातून मिळालेली सर्व रक्कम भरतगड हायस्कूलच्या शैक्षणिक गरजांसाठी देण्यात येणार आहे. तसेच या रोपांपासून मिळणार्‍या फुलांची विक्री करून त्यातून मिळालेले पैसे संस्थेला देणगी स्वरुपात देण्याचे ठरले. ही कल्पना शाळा समिती अध्यक्ष विठ्ठल लाकम व संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक यांच्या संकल्पनेतून पुढे आली आणि ती प्रत्यक्षात साकारली. विठ्ठल लाकम, सोनोपंत बागवे, विद्या लाकम, प्र. मुख्याध्यापक एस. आर. कांबळे, एस. एस. हळवे, एस. एस. मसुरेकर, ए. व्ही. कोदे, गणेश सावंत, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेतले.
--------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95612 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..