शिक्षकांचे 24 ला एकदिवशीय धरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांचे 24 ला एकदिवशीय धरणे
शिक्षकांचे 24 ला एकदिवशीय धरणे

शिक्षकांचे 24 ला एकदिवशीय धरणे

sakal_logo
By

शिक्षकांचे २४ ला
एकदिवशीय धरणे
राज्यव्यापी आंदोलन ः प्रलंबित प्रश्नांकडे वेधणार लक्ष
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ‘आम्हाला शिकवू द्या’ या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी २४ ला एकदिवशीय धरणे आंदोलन संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय शनिवारी (ता. १०) झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत घेण्यात आला.
सेवेशी प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी बांधिलकी जपणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना अवमानीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीविषयी चीड व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने केले आहे.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने चार टप्प्यात शिक्षकांच्या मागण्यांसाठी आंदोलनांचा निर्णय घेतला आहे. भारतातील २४ राज्यात आंदोलन होत असून पहिल्या टप्प्यात शिक्षक दिनी शिक्षकांच्या स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पाठविण्यात आलेले आहे. दुसऱ्या टप्प्यात २४ ला राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जुनी पेंशन योजना लागू करा. शिक्षण सेवक योजना बंद करून नियमित शिक्षकांची नेमणूक करा. नवीन शैक्षणिक धोरणातील समूह शाळा, स्वयंसेवक नेमणूक यासारख्या शिक्षक विरोधी तरतुदी काढून टाका. सातवा वेतन आयोगाच्या सर्व तरतुदी लागू करून लाभ द्या. खंड २ प्रकाशित करा. प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा, यांसह अनेक जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक आंदोलनाची नोटीस महाराष्ट्र शासनाला दिली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री यांना शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजा कविटकर, जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95638 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..