लांजा ः लांजाचा मूळ ढाचा बदलणार असेल तर नको आराखडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा ः  लांजाचा मूळ ढाचा बदलणार असेल तर नको आराखडा
लांजा ः लांजाचा मूळ ढाचा बदलणार असेल तर नको आराखडा

लांजा ः लांजाचा मूळ ढाचा बदलणार असेल तर नको आराखडा

sakal_logo
By

लांजाचा मूळ ढाचा बदलणारा नको आराखडा

नागरिकांची भूमिका ; कागद रंगवून नको दिशाभूल

लांजा, ता. १३ ः लांजाचा मूळ ढाचा बदलणार नाही, पारंपरिक रस्ते, वाड्यांची रचना, शेतजमीनी, गावठाण आदींना कोणताही धोका निर्माण होणार नाही या दृष्टीने शहराचा आराखडा निर्माण व्हावा अशी भूमिका लांजातील नागरिकांनी आग्रहीपणे मांडली. येथील परंपरागत असलेल्या जमिनी, रस्ते या सोबतच एकूण शहरातील जमिनींचा चालू वापर लक्षात घ्यावा. असे होणार नसेल तर हा प्रारूप विकास आराखडा बनवू नये, अशी भूमिका लांजातील नागरिकांनी सोमवारी ( ता.१२) झालेल्या बैठकीत घेतली.
लांजा नगरपंचायतीच्यावतीने प्रारूप विकास आराखडा बैठक सोमवारी लांजा नागरी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, शासकीय, सामाजिक संस्था, स्थानिक विकासक, वास्तूविशारद, पत्रकार आदींसह सर्वच स्तरातील नागरिक उपस्थित होते. शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी मूलभूत गरजा अंतर्भूत करण्यासाठी नागरिकांनी सूचना मांडाव्यात, अशी मागणी सुरवातीला प्रशासनाने केली. यावर नागरिकांनी नागरी सुविधांना प्राधान्य देण्यात यावे. शहर विकास आराखडा भविष्याच्यादृष्टीने विचार करून केला जाणार आहे. केवळ कागदोपत्री आराखडे बनवून नागरिकांची दिशाभूल करू नये. यासाठी हा आराखडा कार्यालयात बसून बनवण्यापेक्षा तो प्रत्यक्षात शहरात फिरून होणे गरजेचे असल्याचे मत या वेळी सर्वच नागरिकांनी बैठकीत मांडले.या बैठकीला नगररचना विभागाचे अधिकारी प्रभुणे, यादव, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी मडकईकर, प्रभारी सीईओ भोसले, लांजा मुख्याधिकारी तुषार बाबर, नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

चौकट
दर सुधारित झालेले नाहीत
प्रारूप विकास आराखडा करण्यापूर्वी शहराच्या हद्दीतील जागेचे दर पूर्वीचेच राहिले आहेत. सुधारित दर झालेले नाहीत. रेडिरेकनरचा दर खूप कमी आहे. प्रस्तावित गावनकाशे करताना अर्ध्या शहराचा सिटी सर्व्हे झालेला आहे. नकाशे रेकॉर्ड आलेले आहेत. नकाशा नगरपंचायतीकडे दिले आहेत; मात्र सिटी सर्व्हे निम्मा झाला आहे.या गोंधळाचा लोकांना याचा नाहक त्रास होत आहे. यासारख्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी मांडले. शहरातील मूळ वस्तीतील रस्ते, शहराच्या मूळ ग्रामीण भागातील रस्ते यासाठी गरज असेल तेवढीच जमीन घेतली पाहिजे. तिथे वाढीव रुंदीच्या रस्त्यांची अट लादू नये.अशी मागणी करण्यात आली.


कोट
आराखडा बैठकीत लांजातील नागरिकांनी मांडलेल्या योग्य त्या सूचनांचे पालन होणे गरजेचे आहे. जर सूचनांचे पालन केले गेले नाही तर लांजा नगरपंचायतीचा मान्यता ठराव दिला जाणार नाही. जोपर्यंत विकास आराखडा होत नाही, तोपर्यंत खीळ बसेल. काय मूलभूत गरजा आहेत, त्या मांडाव्यात. योग्य सूचनांचे पालन करण्यात येईल.
- मनोहर बाईत, नगराध्यक्ष

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95649 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..