गणरायाचरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणरायाचरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य
गणरायाचरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य

गणरायाचरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य

sakal_logo
By

swt१३१०.jpg
४९८४९
सावंतवाडी : वैश्यवाडा सार्वजनिक गणपतीसमोर मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

गणरायाचरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य
अंगारकीचे निमित्तः सावंतवाडी-वैश्यवाड्याचा गणेशोत्सव
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ः शहरातील वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरु आहे. २१ दिवसांसाठी स्थानापन्न करण्यात आलेल्या गणरायाचरणी आज अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने सहस्त्र मोदकांचा नैवेद्य भाविकांकडून अर्पण करण्यात आला. यावर्षी सुमारे ५,५५६ एवढी मोदकांची संख्या भरली.
वैश्यवाडा हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी २१ दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठा करण्यात येते. दररोज भजनादी कार्यक्रम ''श्रीं'' समोर सादर केले जातात. आज अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने सकाळी सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. तर दुपारी १ वाजता महाआरती व त्यानंतर ''श्री'' चरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावर्षी गणेशोत्सवातील संकष्टीला अंगारक योग आल्याने वैश्यवाड्यातील भाविकांत मोठा उत्साह दिसून आला. सकाळी सावंतवाडी येथील वेद पाठशाळेच्या बटूंच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमात प्रथमेश सुकी यांना ''श्रीं''च्या पूजेचा मान मिळाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. गणेशात्सवानिमित्त रोज होणाऱ्या भजनादी कार्यक्रमात महादेव गावडे, प्रकाश सुकी, शरद सुकी, झकास मित्रमंडळ वैश्यवाडा, आनंद नेवगी, वैश्यवाडा महिला मंडळ, प्रकाश मिशाळ, नीलेश नार्वेकर, धोंडी दळवी, डॉ. दादा केसरकर (पंचखाद्य प्रसाद) आदींनी सहभाग घेतला आहे. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी ७ वाजता या गणेशोत्सवाची सांगता भव्य विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. यावेळी सवाद्य मिरवणुकीत आकर्षक देखाव्यासह स्थानिकांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95656 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..