जनसेवा ग्रंथालयाच्या उत्कृष्ट वाचक पुरस्कारांचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनसेवा ग्रंथालयाच्या उत्कृष्ट वाचक पुरस्कारांचे वितरण
जनसेवा ग्रंथालयाच्या उत्कृष्ट वाचक पुरस्कारांचे वितरण

जनसेवा ग्रंथालयाच्या उत्कृष्ट वाचक पुरस्कारांचे वितरण

sakal_logo
By

rat13p9.jpg
49802
रत्नागिरीः जनसेवा ग्रंथालयातर्फे उत्कृष्ट वाचक पुरस्कार विजेता ऋषिकेश केळकर याला सन्मानित करताना अध्यक्ष प्रकाश दळवी. सोबत गजानन पाटील, माधव अंकलगे, अरूण नेरूरकर आदी.

जनसेवा ग्रंथालयाच्या उत्कृष्ट वाचक पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी, ता. १३ः लक्ष्मीचौक येथील जनसेवा ग्रंथालयाच्या ३४व्या वर्धापनदिनानिमित्त उत्कृष्ट वाचक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. साडेतीनशेहून अधिक वाचकांमधून पुरस्कार निवड समितीने दोन गटात चार वाचकांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन सन्मानित केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात कार्यक्रम झाला.
प्रौढ गटात अनुराधा चांदोरकर यांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार देण्यात आला. बालगटात हर्ष पाटील याला प्रथम तर ऋषिकेश केळकर, शारदा अभ्यंकर यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार निवड समितीतर्फे पुरस्कार विजेते निवडण्याचे काम कार्यकारिणी सदस्य अमोल पालये आणि ग्रंथपाल सिनकर यांनी पाहिले. कार्यक्रमाच्या सुरवातीला पुरस्कार निवड समिती प्रमुख अमोल पालये यांनी उत्कृष्ट वाचक पुरस्कार निवड प्रक्रियेबाबत भूमिका मांडली. हा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येईल. यामुळे वाचकांना वाचण्यास प्रवृत्त करण्याचे काम होईल, असा विश्वास जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी व्यक्त केला.
केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसापचे कार्यवाह माधव अंकलगे, कोमसापचे सल्लागार अरुण नेरूरकर, जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुळकर्णी, डॉ. शरद प्रभुदेसाई, डॉ. श्रीकृष्ण जोशी, विवेक भावे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95657 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..