संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

भाजप चिपळूण कार्यकारिणीची बैठक
चिपळूण ः चिपळूण तालुका भाजप ग्रामीण कार्यकारिणीची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर गांधी जयंतीपर्यंत सेवा पंधरवडाअंतर्गत सेवाकार्य करण्याची योजना प्रदेश समितीने निश्चित केलेली आहे. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या जनकल्याणकारी कामांसंदर्भात त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ७५० धन्यवादपत्र प्रदेश कार्यालयात पाठवणे, महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवणे, विहिरीलगतचा परिसर स्वच्छ करणे, वृक्षारोपण कार्यक्रम, नमो अॅप आदी विषयावर चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले आप्पा खैर, श्रीराम पवार, दत्ताराम घाग, अनारीतील भरत जाधव, संदीप पवार यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला. टेरवचे चंद्रशेखर कदम यांनी बैठकीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
...............

खेडमध्ये बूस्टर डोसचा
११ हजाराचा टप्पा पार
खेड ः तालुक्यात बूस्टर डोस लसीकरणाचा ११ हजाराचा टप्पा पार झाला आहे. आतापर्यंत ११ हजार ८१८ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. वावे विभागात सर्वाधिक नागरिकांनी हा डोस घेतला असून, ही संख्या १९२३ इतकी झाल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नगर पालिका हद्दीत १४०२, तळे- १३७१, कोरेगाव-६५१, फुरूस- १४०८, आंबवली- ९३४, लोटे-१४३४, शिवबुद्रुक- १३२४, तिसंगी- १००४ तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत ३६४ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे.
---
छत्रपती संभाजी महाराजांवर
रत्नागिरीत उद्या व्याख्यान
रत्नागिरी ः आसमंत बेनोव्हलन्स फाउंडेशनतर्फे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता प्रेरणादायी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प येत्या गुरुवारी (ता. १५) सकाळी ११ वा. गुंफले जाणार आहे. फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराजांवर व्याख्यान होणार आहे. धामणी, संगमेश्वर येथील प्रसिद्ध व्याख्याते श्रीनिवास पेंडसे व्याख्यान देणार आहेत. जेव्हा मुलं शिकत आहेत त्याच वयात छत्रपती संभाजी महाराज मराठी स्वराज्यासाठी लढत होते. आयुष्य सहजसोप्या मार्गाने काही देत नाही. झगडावं लागतं, परिश्रम करावे लागतात आणि त्यासाठी मनाची खूप तयारी असावी लागते. छत्रपती संभाजी महाराज हे एक मोठं प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आसमंत बेनोव्हलन्स फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95666 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..