प्रथमेश आमडोसकर सजावट स्पर्धेत प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रथमेश आमडोसकर सजावट स्पर्धेत प्रथम
प्रथमेश आमडोसकर सजावट स्पर्धेत प्रथम

प्रथमेश आमडोसकर सजावट स्पर्धेत प्रथम

sakal_logo
By

swt१३१६.jpg
४९८६९
पालः गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना प्रा. सचिन परुळकर, संजय पाटील व अन्य.

प्रथमेश आमडोसकर सजावट स्पर्धेत प्रथम
वेंगुर्ले, ता. १३ ः युवा कला क्रीडा मंडळ, पाल-वेंगुर्ले आयोजित पाल गाव मर्यादित घरगुती गणेश सजावट स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ''पर्यावरणपूरक सजावट'' या विषयावर आधारीत या स्पर्धेत पाल गावातील ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांमधून सर्वोत्तम १६ स्पर्धकांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे पाहिले वर्ष असूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत प्रथमेश आमडोसकर यांनी प्रथम, रमेश घाडी द्वितीय, तर पांडुरंग उर्फ आबा मांजरेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. आकर्षक गणेशमूर्तीबद्दल आपा गावडे यांना उतेजनार्थ गौरविण्यात आले.
सर्व विजेत्यांना मनावरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रा. सचिन परुळकर यांनी मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व विशद केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. परुळकर व संजय पाटील यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते किरण गावडे, जगन्नाथ गावडे, सिद्धेश गावडे, वैभव गावडे, प्रथमेश गावडे, साबाजी राऊळ, मोहन पालकर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95674 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..