संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

फोटो- rat१०p१२.jpg -KOP२२L४९१५४ समर्थ स्कुलमधील स्वच्छता अभियानात सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक

समर्थ स्कुलमध्ये स्काऊट गाईडतर्फे स्वच्छता अभियान
खेड : तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्‍व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात स्काऊट गाईडतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सभोवतालच्या परिसराची स्वच्छता करत परिसर चकाचक केला. गणपती विसर्जन केल्यानंतर त्या ठिकाणचा परिसरही स्वच्छ करण्यात आला. स्काऊट गाईडप्रमुख मंगेश सुतार, राधा चव्हाण, रसिका पालांडे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे, प्राचार्य डॉ.एस.एस.अली, पर्यवेक्षक ए.एच.घोसाळकर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

फोटो- rat१०p१४.jpg - KOP२२L४९१५६ एलआयसी शाखेसमोर निदर्शने करताना विमा प्रतिनीधीं

एलआयसी विमा प्रतिनिधींची खेड शाखेसमोर निदर्शने
खेड : भारतीय जीवन बिमा निगम संलग्न शाखा दापोली यांच्याकडून येथील शाखेच्या प्रांगणात सकाळी १० ते ३ यावेळेत बहुसंख्य एलआयसी एजंट यांनी काम बंद आंदोलन करत शांततापूर्ण निदर्शने केली. पॉलिसीवरील जीएसटी बंद करावे, विमेदारांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदर कमी करावा, पाच वर्षापेक्षा जास्त काळ बंद झालेल्या पॉलिसी सुरू कराव्यात, एजंटांसाठी पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड सुरू करावा, पॉलिसीधारकांनी दावा न केलेल्या रकमा सामाजिक सुरक्षा योजनेत जमा केले जावू नये, एकदा विमेदाराकडून केवायसी घेतल्यानंतर त्याच विमेदारांकडून वेळोवेळी केवायसीची मागणी करण्यात येवू नये, विमाप्रतिनींधींच्या कमिशनदरात कपात न करता वाढ करण्यात यावी, भारत सरकारने विमाप्रतिनिधींना व्यावसायिक म्हणून मान्यता द्यावी आदी मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली. याप्रंसगी असोसिएनशचे अध्यक्ष अतुल शेठ, उपाध्यक्ष उत्तमकुमार जैन, सचिव उमेश नक्षे, सहसचिव गौरव पाडाळकर, सदस्य सनील मापारा, संदिप सुरा, सचिन बुटाला, अनंत प्रभू, मामा कोठारी, इलिसाय खतिब, सुप्रिया भोसले, विजय टकळे, सतिश गमरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

-------------------


फोटो- rat१०p१५.jpg OP२२L४९१५७- मंथन बुटाला मंथन बुटाला

ज्ञानदीपचा मंथन बुटाला
इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेत प्रथम
खेड ः तालुक्यातील भडगाव येथील कै.प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिरचा विद्यार्थी मंथन शशांक बुटाला याने इतिहास प्रज्ञाशोध परिक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याने १०० पैकी ९१ गुण मिळवले. त्याला इतिहास कुमार प्रज्ञावंत हे मानांकन, प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिक प्राप्त केले आहे. त्याला संतोष भोसले, दिलीप मोहीते, महादेव वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95684 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..