वेंगुर्लेत 27 ला पर्यटन व्यावसायिकांचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत 27 ला पर्यटन व्यावसायिकांचा मेळावा
वेंगुर्लेत 27 ला पर्यटन व्यावसायिकांचा मेळावा

वेंगुर्लेत 27 ला पर्यटन व्यावसायिकांचा मेळावा

sakal_logo
By

swt१३१४.jpg
४९८६७
वेंगुर्ले ः पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

वेंगुर्लेत २७ ला पर्यटन
व्यावसायिकांचा मेळावा
बाबा मोंडकर ः समस्या सोडविण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १३ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टुरिझमला जागतिक पर्यटन दिनी म्हणजेच २७ ला दुपारी ३ ते ६.३० या वेळेत वेंगुर्लेत होणाऱ्या जिल्ह्यास्तरीय पर्यटन व्यावसायिकांच्या मेळाव्यातून वेंगुर्लेसह जिल्ह्यास संजीवनी देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी या मेळाव्यास केंद्र व राज्यातील मंत्री, पर्यटन विभागाचे अधिकारी यांना निमंत्रित करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
येथील साई मंगल कार्यालयात पर्यटन व्यावसायिक महासंघ, सिधुदुर्गतर्फे वेंगुर्लेसह जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात विविध स्वरुपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची बैठक पर्यटन महासंघाचे अध्यक्ष मोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, महेश सामंत, प्रथमेश सावंत, दिलीप कुडव, प्रवीण सामंत, उमाकांत आरावंदेकर, संग्राम सावंत, मधुर चिपकर, गुरुनाथ गिरप, नामदेव भुते, गुरुनाथ मडवळ, गोविंद केळुसकर, विजय ठाकूर, अरुण बागकर, गोविंद बागकर, नेहा वेर्णेकर यांसह विविध स्वरुपाचे पर्यटन व्यवसाय करणारे व्यावसायिक उपस्थित होते.
या बैठकीत पर्यटन महासंघाच्या वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदाच्या रिक्त पदावर भोगवेचे पर्यटन व्यावसायिक महेश सामंत यांची निवड मोंडकर यांनी जाहीर केली. बैठकीच्या सुरुवातीला पर्यटन व्यावसायिक महासंघाचे तत्कालीन वेंगुर्ले तालुकाध्यक्ष दीनानाथ वेर्णेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95706 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..